पोपट पिटेकर, झी 24 तास मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वीज बिलावरुन अनेक वाद झाले. वीज कमी वापरुनही लाईट बिल खुप येत असल्याच्या अनेक तक्रारी देखील आल्या. आता पावसाच्या दिवसात वीज खंडीत होणे तसंच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणं, असं अनेक वेळा होतं. कधीकधी तर आपल्या परिसरातील ट्रान्सफॉर्मर जळाल्याचा घटना देखील आपण पाहतो. ट्रान्सफॉर्मर जळाले की, लाईट अनेकदा किती तरी तास नसतो. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर असणे खुप महत्त्वाचं आहे. (Do you know how important the work of power transformer)
तुम्ही देशातील कोणत्याही काना कोपऱ्यात राहात असाल, मुंबईत, किंवा छोट्या गाव खेड्यात तुम्हाला विद्युत ट्रान्सफॉर्मर नक्कीच पाहायला मिळेल. हे ट्रान्सफॉर्मर आपले घर , कार्यालयासह इतर सर्व ठिकाणी वीजपुरवठा करण्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात. पण ट्रान्सफॉर्मर नसेलच तर घरातील कोणतेच उपकरण व्यवस्थित चालणार नाहीत. तसेच लवकरच खराब देखील होतील. एवढचं नाही ट्रान्सफॉर्मर नसेल तर विद्युत उपकरणं यांना आग सुद्धा लागू शकते. ज्यामध्ये आपलं नुकसान होऊ शकतो. चला तर पाहुयात ट्रान्सफॅार्मरचं काय काम असतं आणि कशा पद्धतीने काम करतो.
ट्रान्सफॉर्मर काय काम करतो?
ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भात जाणून घेताना हे समजून घेणं गरजेचं आहे की, ट्रान्सफॉर्मर हे एक विद्युत उपकरण आहे. ट्रान्सफॉर्मरचं प्रमुख काम हे विजेचा पुरवठा कमी किंवा जास्त करणे आहे. तसेच नॅार्मल पद्धतीने विज पुरवठा करणे देखील आहे. सोप्या पद्धतीत सांगायचं झालं तर ट्रान्सफॉर्मर हे गरजेनुसार वीज पुरवठा करतो. एखाद्या भागात जास्त विजेची आवश्यकता असेल तर तिथे जास्त वीज पुरवठा करणे, आणि काही भागांत कमी वीज लागत असेल, तर ट्रान्सफॉर्मर कमी वोल्टने वीज पुरवठा करतो. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की ट्रान्सफॉर्मर हेच विजनिर्मिती करतो. पण तसं अजिबात नाही.
ट्रान्सफॉर्मर हे फक्त तुमच्या घरांपर्यंत वीज पुरवठा करण्याचं एक माध्यम आहे. ट्रान्सफॉर्मर विजची वारंवारता कमी न करता गरजेनुसार कमी किंवा जास्त पद्धतीने पुरवठा करतो.
म्युचुएल इंडक्शनच्या सिद्धांतावर काम करतो ट्रान्सफॉर्मर...
ट्रान्सफॉर्मर अनेक प्रकारचे असतात. पण कोरच्या संरचनेनुसार, तीन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स आहेत.
१) कोअर ट्रान्सफॉर्मर :- हा ट्रान्सफॉर्मर हाय आउटपुट व्होल्टेजसाठी वापरला जातो.
२) शेल ट्रान्सफॉर्मर :- हे ट्रान्सफॉर्मर लो आउटपुट व्होल्टेजसाठी वापरले जाते. शेल प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स बहुतेक सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर्समध्ये वापरले जातात.
३) बेरी ट्रान्सफॉर्मर :- बेरी प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर्सची रचना थोडी गोंधळात टाकणारी असते.याची दुरुस्ती राखणे देखील थोडे कठीण असते.त्यामुळे बेरी प्रकारचे ट्रान्सफॉर्मर्स फार लोकप्रिय नाहीत.
व्होल्टेजनुसार ट्रान्सफॉर्मरचे प्रकार ?
व्होल्टेज जास्त किंवा कमी करण्यावरून ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार असतात.
1) स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर :- जास्त असलेले व्होल्टेज कमी व्होल्टेजमध्ये रूपांतरित करून त्याचे व्यवस्थित व्होल्टेज देण्याचं काम स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर करतो. या ट्रान्सफॉर्मरचा वापर व्होल्टेज कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
2. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर :- कमी असलेलं व्होल्टेज अधिक व्होल्टेजमध्ये रूपांतरित करून योग्य पद्धतीने व्होल्टेज देण्याचं काम स्टेप अप ट्रान्सफॉर्मर करतो. या ट्रान्सफॉर्मरचा वापर जिथे व्होल्टेज जास्त लागेल अशा ठिकाणी स्टेप अप ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. अशा पध्दतीने ट्रान्सफॉर्मरचं काम चालतं, आणि हे ट्रान्सफॉर्मर खुप महत्त्वाची भूमिका बजावतो.