Indian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित

Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे.  रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. 

Updated: Dec 13, 2022, 12:34 PM IST
Indian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित title=
Do you know the reason for the yellow band on the railway platform interesting fact nmp

Railway Station Platform : देशातील कोट्यावधी लोक हे रेल्वेने प्रवास करतात. स्वस्त आणि जलद अशी ही सेवा असल्याने सर्वसामान्यांसाठी तो दैनदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. मुंबईत लोकल (Mumbai Local) ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाइन आहे. या रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यतकारक गोष्टी आहेत. ट्रेन (train), एक्स्प्रेसचा (Express) यांचा वेगवेगळा रंग, ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' हे असे अनेक गोष्टी ज्या आपल्याला प्रवासादरम्यान दिसतात. अनेकांना प्रश्नही पडतात हे असं का पण त्यांना त्याबद्दल माहिती नसतं. तसंच अजून एक रंजक सत्य आहे, ते म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway platform) पिवळा पट्टा का असतो?

प्लॅटफॉर्मवर पिवळा पट्टा (Yellow belt) का असतो?

तुम्ही प्लॅटफॉर्मवर गेले असता त्यावर पिवळा रंगाचा पट्टा किंवा काही रेल्वे प्लॅटफॉर्मवर चक्क पिवळा रंगाच्या टाईल्सच लावलेल्या दिसतात. त्यामागील रहस्य जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.  (Do you know the reason for the yellow band on the railway platform  interesting fact) 

 

हेसुद्धा वाचा - Indian Railways :...म्हणून रेल्वेच्या बोगी वेगवेगळ्या रंगाच्या असतात

 

 पिवळी पट्टी पृष्ठभागावरुन थोडी उंच असते कारण...

तुम्ही पाहिलं असेल रेल्वे प्लॅटफॉर्मवरील ही पिवळ्या रंगाची पट्टी असते आणि ती पृष्ठभागावरुन थोडी उंच असते. याचा मागे कारण आहे ते दृष्टिहीन व्यक्तींच्या सुरक्षेसाठी...जेव्हा दृष्टिहीन व्यक्ती प्लॅटफार्मवरून चालत असताना रेल्वे रुळावर पडू नये म्हणून त्यांचासाठी हा इशारा असतो. जेणे करून ते कोणाचीही मदत न घेता सुरक्षेत अंतराने चालतात. 

 

हेसुद्धा वाचा - Trending News : पांढऱ्या - पिवळ्याच नाही तर या 4 रंगांच्याही असतात गाड्यांच्या नंबर प्लेट्स!

 

पिवळा पट्टा असतो कारण...

आता प्लॅटफॉर्मवर पिवळा पट्टा का असतो या प्रश्नाचं  उत्तर जाणून घेऊयात. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचणार असते, तेव्हा लोक ट्रेनमध्ये चढण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या जवळ एकच गर्दी करतात. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवर येते तेव्हा जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे आपण ट्रेनकडे खेचल्या जातो. म्हणून रेल्वेकडून खबरदारी म्हणून पिवळा पट्टा बनविण्यात आला आहे. याचा उद्देश प्रवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांनी या पट्ट्याच्या मागे उभे राहवे असा आहे.