प्रेम होण्यासाठी मन नाही, तर ही गोष्ट आहे कारणीभूत; जाणून घ्या तुमच्या प्रेमाचं Science

परंतु तुम्हाला माहितीय का? प्रेम हे एक विज्ञान आहे आणि याचा फॉर्म्युला तुम्ही लॅबमध्ये ही बनवु शकता.

Updated: Feb 16, 2022, 06:03 PM IST
प्रेम होण्यासाठी मन नाही, तर ही गोष्ट आहे कारणीभूत; जाणून घ्या तुमच्या प्रेमाचं Science  title=

मुंबई : आपल्यापैकी प्रेत्येकाने आयुष्य़ात एकदातरी प्रेमाचा अनुभव घेतलच असले. प्रेम ही अशी भावना आहे की, यामुळे आपल्याला आपल्या आजुबाजुच्या जगाचा विसर पडतो. ज्यामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टी सुंदर आणि चांगल्या वाटू लागतात. प्रेमाच्या अनेक संकल्पना समोर आल्या आहेत. काहींना प्रेम हा मनाचा खेळ वाटतो, तर काहींना शरीराचा. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आणि आपल्या सोईनुसार प्रेमाची व्याख्या तयार केली आहे आणि सहाजिकच प्रत्येकाचं नातं हे वेगवेगळ्या गोष्टींवर टिकून असतं.

परंतु तुम्हाला माहितीय का? प्रेम हे एक विज्ञान आहे आणि याचा फॉर्म्युला तुम्ही लॅबमध्ये ही बनवु शकता. कारण प्रेम हे मनाने नाही तर तुमच्या डोक्यानं होतं. तुम्ही याला प्रेमाचे विज्ञान देखील म्हणू शकता. हे कसं शक्य आहे, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

प्रेमाच्या भावनांसाठी तुमचे हृदय नाही तर फक्त तुमचे मन आणि शरीरातील काही रसायने जबाबदार असतात. म्हणजेच, जर तुमच्या शरीरात काही विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स तयार झाले, तर तुम्हाला असे वाटू लागते की, तुम्ही प्रेमात आहात.

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, प्रेमाच्या भावना एखाद्या व्यक्तीला तीन टप्प्यात प्रभावित करतात-

पहिली स्टेप म्हणजे, एखाद्याला मिळवण्याची इच्छा. या दरम्यान, मेंदू टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन नावाचे हार्मोन्स वेगाने सोडू लागतो. याला तुम्ही वासना असेही म्हणू शकता.

दुसरा स्टेप म्हणजे, आकर्षण. या दरम्यान, मेंदू डोपामाइन, नॉरपेनेफ्रिन आणि सेरोटोनिन नावाचे हार्मोन्स सोडतो. डोपामाइन तुमच्या भावनांसाठी जबाबदार आहे. यामुळे तुम्हाला बक्षीस जिंकल्यासारखा आनंद मिळतो. तर नॉरपेनेफ्रिन तुम्हाला उर्जेने भरते. त्यातून भविष्याची स्वप्ने आपण रंगवायला लागतो आणि कधी कधी यामुळे तुमची भूक, तहान आणि झोपही नाहीशी होते. दुसरीकडे, सेरोटोनिन तुमचा मूड चांगला बनवते. प्रेमाचा प्रारंभिक टप्पा या हार्मोन्सवर चार्ज केला जातो.

तिसरी स्टेप म्हणजे, एखाद्यासोबत असलेली अटॅचमेंट. यासाठी प्रामुख्याने दोन रसायने जबाबदार आहेत. पहिले ऑक्सिटोसिन आणि दुसरे व्हॅसोप्रेसिन. मात्र, या टप्प्यावर पोहोचण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातून सुरक्षितपणे बाहेर पडणे आवश्यक आहे. ऑक्सिटोसिन प्रेमात स्थिरता आणि परिपक्वता आणते.

हे ऑक्सिटॉसिन पालकांच्या समाजाशी त्यांच्या मुलांबद्दल प्रेम, मैत्री आणि चांगले संबंध राखण्यासाठी देखील जबाबदार आहे. ज्यामुळे आपल्या जवळील व्यक्तीला मिठी मारल्यामुळे आपल्या मनाला बरं वाटतं.

असं म्हणतात की जेव्हा प्रेम होतं तेव्हा हृदयात घंटा वाजते किंवा आपल्याला सुंदर आवाज ऐकू येतात. परंतु हा सर्व मनाचा खेळ आहे. मेंदूची डावी बाजू आपल्या भावनांसाठी जबाबदार असते. विज्ञानाच्या भाषेत त्याला लिंबिक सिस्टीम म्हणतात. एखाद्याला पाहिल्यावर मेंदूच्या या भागात रसायनांचे कॉकटेल तयार होते. आनंदी संप्रेरके बाहेर पडू लागतात आणि आपल्याला संपूर्ण जग चांगलं वाटू लागतं.

प्रेम जेवढं तुम्हाला आनंदी करतं, तेवढं तुम्हाला तणाव देखील देतं. नात्यातील समस्यांमुळे लोकांच्या मेंदूत कॉर्टिसॉल हार्मोन सोडला जातो. त्याला स्ट्रेस हार्मोन असेही म्हणतात. प्रेमात आजारी वाटण्यामागे तुम्ही या हार्मोनला दोष देऊ शकता.

मग रासायनिक प्रेम खरे प्रेम आहे का?

हे लक्षात घ्या की, प्रेमात तुमचे स्वतःचे असे काहीही नसते, सर्व काही दुसऱ्यासाठी समर्पित असते. प्रेमाबद्दल संत कबीरांनी त्यांच्या एका दोहेतात देखील एक गोष्ट सांगितली आहे, ते म्हणाले की प्रेमाचा रस्ता इतका अरुंद आहे की त्यात दोघांना स्थान नाही, त्यामुळे एका व्यक्तीला यामधून गायब व्हावे लागेल.

प्रेमाच्या काही अटी देखील असतात ज्यात पहिली अट असते ती स्वातंत्र्य. प्रेमात पडल्यानंतर जर तुम्हाला मोकळेपणा वाटत नसेल तर तुमचे प्रेम हे फक्त काही रासायनिक बदलांचा परिणाम आहे, यापेक्षा जास्त काही नाही.

प्रेमाची सुरुवात मनापासून होते आणि मन त्यांचे वय ठरवते. म्हणजेच तुमचं नातं किती दिवस टिकणार, हे तुमच्या भावना ठरवतात.