'महिलांना इच्छेविरुद्ध कोणी स्पर्शही करु शकत नाही'

 'महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणी स्पर्शही करु शकत नाही', असे विधान दिल्लीतील एका कोर्टाने केले आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 22, 2018, 07:37 AM IST
 'महिलांना इच्छेविरुद्ध कोणी स्पर्शही करु शकत नाही' title=

नवी दिल्ली : 'महिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणी स्पर्शही करु शकत नाही', असे विधान दिल्लीतील एका कोर्टाने केले आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली. 

५ वर्ष शिक्षा, १० हजार दंड 

 महिलांना नासमज आणि यौन-विकृत पुरूषांकडून त्रास होणे हे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

९ वर्षीय मुलीची छेड काढण्याच्या आरोपात आरोपीला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाने त्याला १० हजाराचा दंड ठोठावला त्यातील ५ हजार रुपये पीडितेला देण्यात येणार आहेत. 

चुकीचा स्पर्श 

 २०१४ मध्ये यूपीतील मार्केट मुखर्जी नगरमध्ये एका अल्पवयीन मुलीला चवी राम या आरोपीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. 

महिलेचे शरीर हे त्यांचे स्वत:चे आहे. त्यावर त्यांचाच पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या परवानगीविना कोणी त्यांना स्पर्शही करु शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. 

दिल्ली प्रदेश विधिक सेवा प्राधिकरणाने या पीडित मुलीला ५० हजार रुपये द्यावेत असे कोर्टाने म्हटले आहे.