गाण्यावर नाचत असतानाच तरुणांवर कोसळला डीजे; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Viral Video : उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये काही मुले मिरवणूकीत नाचत असताना त्यांच्या अंगावर भलामोठा डीजे सेट कोसळ्याची घटना घडली आहे. या घटनेत चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 1, 2023, 06:00 PM IST
गाण्यावर नाचत असतानाच तरुणांवर कोसळला डीजे; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल title=

Viral Video : आता कोणताही सणवार असो किंवा कोणताही समारंभ कोणत्याही कार्यक्रमात डीजे (DJ) हवाच असा हट्ट अनेकांचा दिसतो. ध्वनी प्रदूषणासोबत (noise pollution) या डीजेमुळे अनेकांना विविध आजारांनाही तोंड द्यावं लागतं. मात्र तरुणाईचे डीजेचे वेड काही केल्या कमी होत नाहीये. मात्र उत्तर प्रदेशात (UP Accident) दुर्गा पूजेदरम्यान भीषण अपघात घडलाय. विसर्जन मिरणुकीत डीजेच्या तालावर नाचणाऱ्या तरुणांवर डीजे कोसळल्याने हा अपघात घडला. उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये विसर्जनासाठी जात असताना रविवारी हा अपघात घडल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

आजमगडमध्ये घडलेल्या या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी दुपारच्या सुमारास काही लोकांना दुर्गा विसर्जनासाठी मिरवणूक काढली होती. मिरणवुकीत डीजेची भिंत उभारण्यात आली होती आणि तो मोठ्याने वाजत होता. डीजे वाजवताना आजूबाजूचा परिसर देखील हादरत होता. मात्र कुणाचेही त्याकडे लक्ष नव्हते. मिरवणूकीतील तरुणाई डीजेच्या तालावर नाचण्यात दंग होती. मात्र शेवटी नाचणाऱ्या गर्दीवर डीजे पडला आणि 3-4 जण जखमी झाले.

आझमगडमधील फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला आहे. दसऱ्यानंतर येथे दुर्गा विसर्जन केले जाते. 29 ऑक्टोबर रोजी काही लोक दुर्गा विसर्जन करण्यासाठी जात होते. त्यावेळी मिरवणूकीत 12-15 लोक डीजेवर नाचत होते. 'अभी तो पार्टी शुरू हुई है' हे बादशहाचं गाणं वाजत होतं. त्यावेळी आवाजामुळे डीजे दोनदा जोरात हलला. त्यानंतर डीजेची गाडी पुढे गेली आणि भलेमोठे स्पिकर्स नाचणाऱ्या लोकांवर पडते. आजूबाजूच्या लोकांनी त्याचवेळी मदत करत डीजे हटवला. तिथे उपस्थित असलेल्या एकाने हा सगळा प्रकार त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार, या अपघातात चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या अपघातात काही तरुणांना किरकोळ जखमा देखील झाल्या आहेत. या अपघातानंतर आझमगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी याची दखल घेतली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी याची माहिती सोशल मीडियावर देखील पोस्ट केली आहे. मिरवणुकीतील डीजे वाहनाच्या चुकीमुळे पडला. यात अनेक जण जखमी झाले. त्यामुळे डीजेचा मालक आणि वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे, असे पोलिसांनी म्हटलं आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.