Photo Editing Apps: 'या' फोटो एडिटिंग अ‍ॅप्सद्वारे दिवाळीचे फोटो बनवा खास, जाणून घ्या

दिवाळीत काढलेले फोटो एडिट करायचे आहेत, मग या अ‍ॅप्सचा वापर करा, फोटोत दिसाल आणखीणच कुल

Updated: Oct 21, 2022, 04:21 PM IST
 Photo Editing Apps: 'या' फोटो एडिटिंग अ‍ॅप्सद्वारे दिवाळीचे फोटो बनवा खास, जाणून घ्या title=

मुंबई : देशात दिवाळी (diwali 2022) सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वच ठिकाणी प्रसन्न वातावरण आहे. अनेकांच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन सुरु आहे, तर अनेकांच्या घरी पाहूणे आले आहेत.या दरम्यान खूप फोटो सेशन होते. या फोटोसेशनमध्ये काही फोटो चांगले येतात, तर काही फोटो काहीसे खराब य़ेतात. त्यामुळे तुमचे फोटो आणखीण चांगले एडिट करून तुम्हाला पोस्ट करता यावे, यासाठी आम्ही तुम्हाला काही फोटो एडिट (Photo Editing) करण्याचे टीप्स देणार आहेत. हे टिप्स काय आहेत, ते जाणून घेऊयात. 

प्रिस्मा 

प्रिस्मा (Prisma) हे एक फोटो एडिट करण्याचे अप्रतिम अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे ते तुमच्या फोटोला स्केचमध्ये बदलते. त्याच्या स्टाईल लायब्ररीमध्ये बरेच फिल्टर आहेत जे तुमचे फोटो खूप सुंदर बनवतात. विशेष बाब म्हणजे हे अ‍ॅप अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्हीवर उपलब्ध आहे.

मोजो 

मोजो (Mojo) या अ‍ॅपचा वापर 'स्टोरीज आणि रील' तयार करण्यासाठी केला जातो. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कथा इंस्टाग्रामवर पोस्ट करू शकता. तुम्ही तुमचे फोटो कोलाजमध्ये बदलू शकता. यामध्ये असलेल्या अनेक फिल्टरच्या मदतीने तुम्ही तुमचा फोटो सुंदर बनवू शकता. तसेच, त्यात असलेल्या टेम्प्लेट्सच्या मदतीने तुम्ही फोटोंमधून अ‍ॅनिमेशन तयार करू शकता. हे अ‍ॅप अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्हींवरही उपलब्ध आहे.

पोलारे 

पोलारे (Polarr) या अ‍ॅपमध्ये फोटो सुंदर करण्याची सर्व वैशिष्ट्ये आहेत, जसे की एक्सपोजर, हायलाइट्स, कॉन्ट्रास्ट, शॅड़ो आणि कलर कॉन्ट्रास्ट. तुमचे फोटो वेगळे बनवण्यासाठी Polarr उच्च दर्जाचे फिल्टर वापरते. याव्यतिरिक्त, अ‍ॅप तुम्हाला तुमच्या चित्रांमध्ये विविध ओवरले जोडून देतो, जसे कस्टम स्काई, वेदर, क्लाउडस, फ्लेअर्स, टेक्सचर्स इत्यादी. Polare अँड्रॉईड (Android) आणि आयओएस (iOS) दोन्हीवर देखील उपलब्ध आहे.

पिक्सआर्ट 

पिक्सआर्ट (Picsart) द्वारे तुम्ही तुमचे फोटो आकर्षक बनवू शकता तसेच ते सोशल मीडियावर अपलोड करू शकता. याशिवाय यामध्ये अनेक फिल्टर्स देण्यात आले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही दिवाळीचे फोटो सुंदर बनवू शकता. अँड्रॉइड (Android)  आणि आयओएस (iOS) दोन्हीवर अ‍ॅप उपलब्ध आहे.