‘क्या चोर बनेगा रे तू...!’ वाइन शॉपमध्ये चोरी करायला गेला आणि असा सापडला की व्हायरल झाला

THIEF SLEPT IN WINE SHOP: चोरी करायला गेला पण तिथेच अडकून पडला, अशी एक घटना अलीकडेच तेलंगणात घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 31, 2024, 01:30 PM IST
‘क्या चोर बनेगा रे तू...!’ वाइन शॉपमध्ये चोरी करायला गेला आणि असा सापडला की व्हायरल झाला title=
thief came to steal at liquor shop drank too much alcohol and fell unconscious arrested

THIEF SLEPT IN WINE SHOP AFTER ROBBED MONEY AND WINE BOTTLES:  दारूचं व्यसन किती वाईट ठरू शकतं हे एका घटनेतुन पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. दारूपाहून भल्याभल्यांची नियत बिघडते. तेलंगणाच्या मोडक जिल्ह्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. चोर दारूच्या दुकानात चोरी करण्यासाठी शिरला, मात्र तिथे असलेले वेगवेगळ्या प्रकारच्या दारूच्या बॉटल पाहून त्याचं डोकंच चक्रावलं आणि त्याने केलेला कारनामा पाहून पोलिसांनीही डोक्यावर हात मारला. 

चोर कनकदुर्गा नावाच्या दारूच्या दुकानात चोरी करण्यासाठी शिरला होता तिथे पोहोचल्यावर त्याने खूप मदयप्राशन केले. त्याने तिथे खूप दारू आणि बीअर प्यायला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत तो तिथेच बसून राहिला. आपण चोरी करायला आलोय हेच विसरुन गेला आणि दुकानातच तिथेच झोपून गेला. चोर दुकानाचे छत आणि टाइल्स तोडून आत शिरला होता. त्यानंतर त्याने सीसीटीव्ही कॅमरेदेखील तोडून टाकले. त्यानंतर चोराने दुकानातील काही रोख रक्कम आणि दारूच्या बॉटल चोरल्या आणि तेथून पळून जावू लागला. 

चोर तिथून जात होताच की त्याचं नव दारूच्या बॉटलकडे वळलं. चोरीचं सामान बाजूला ठेवून दारू पिण्यासाठी बसला. दारू प्यायल्यानंतर त्याची शुद्ध हरपली आणि तो तिथेच झोपून गेला. जेव्हा सकाळी दुकानाचा स्टाफ आणि मालिक आले तेव्हा त्यांची नजर चोरावर पडली आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चोराला अटक केली. पोलिसांनी पहिले त्याला रुग्णालयात दाखल केले त्याचबरोबर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे. 

पोलिसांनी म्हटलं आहे की, चोराने एका पॉलिथीनच्या पिशवीत दारूच्या बॉटल आणि पैसे घेतले होते. त्यानंतर तो जेव्हा दुकानाच्या बाहेर जायला लागला तेव्हा दारूच्या बॉटल पाहून तो थोडा लालची झाला आणि तिथेच दारू प्यायला लागला. त्यामुळं तो पळून जाऊ शकला नाही. अद्याप या चोराचे नाव समजू शकलेले नाहीये. पोलिस या प्रकरणी अधिक कारवाई करत आहे. पोलिसांनी जेव्हा या चोराला ताब्यात घेतलं तेव्हा तो शुद्धित नव्हता त्यामुळं त्याचं नाव समजू शकलेले नाहीये. चोर शुद्धीत आल्यानंतर त्याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल.