या अभिनेत्रीने आपल्या करियरची सुरुवात 2002मध्ये केली. या अभिनेत्रीने अनेक चित्रपट केले हिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नसला तरी तिच्या अभिनयाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. ही अभिनेत्री आहे अमृता राव आहे. 2003 मध्ये तिने शाहिद कपूरसोबत 'इश्क विश्क'मध्ये अभिनय केला आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला. या चित्रपटामुळे अमृताच्या करिअरची दिशा बदलली. त्यानंतर, तिने महेश बाबूसोबत तेलगू चित्रपट 'अथिदी'मध्येही काम केले, ज्याला यश मिळाले.पण त्या चित्रपटानंतर अमृता रावने तेलगू सिनेमात पुढे कोणतेही प्रोजेक्ट घेतले नाहीत. एका मुलाखतीत तिने सांगितले की, 'तेलुगू सिनेमात महिलांना अनेकदा फक्त ग्लॅमर प्रॉप्स म्हणून पाहिले जाते.'
तिने शाहरुख खानसोबत 'मैं हूं ना' आणि शाहिद कपूरसोबत 'विवाह' या हिट चित्रपटांत काम केले. तिच्या अभिनयाने बॉलिवूडमधील मोठ्या निर्मात्यांचे लक्ष वेधून घेतले. ज्यामुळे तिला 'सिंह साहेब द ग्रेट'मध्ये सनी देओल आणि 'द लिजेंड ऑफ भगत सिंग'मध्ये अजय देवगण यांसारख्या दिग्गज स्टार्ससोबत संधी मिळाली.
पण याबरोबरच एक किस्सा सुद्धा चर्चेत आला. 2006 मध्ये, 'प्यारे मोहन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमृता राव आणि ईशा देओल यांच्यात जोरदार वाद झाला. अनेक रिपोर्ट्सनुसार या वादानंतर ईशा देओलने अमृताला कानाखाली वाजवली होती. ईशा देओलने एका मुलाखतीत म्हटलं की, तिला या घटनेचा पश्चात्ताप नाही आणि अमृता त्यासाठी पूर्णपणे पात्र होती.
अमृता रावने 2014 मध्ये तिचा प्रियकर अनमोल सोबत लग्न केले आणि नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांच्या घरात चिमुकल्याचे आगमन झाले. अमृता आणि अनमोल यांचा एक यूट्यूब चॅनेल 'कपल ऑफ थिंग्स' देखील आहे. ज्यावर ते आपल्या जीवनाशी संबंधित मजेशीर व्हिडीओसह प्रेक्षकांशी संवाद साधतात. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी 'कपल ऑफ थिंग्स' नावाने एक पुस्तक देखील प्रकाशित केले.
अमृता रावच्या करिअरने बॉलिवूडमध्ये अनेक चढ-उतार पाहिले, परंतु तिच्या वैयक्तिक जीवनासाठी आणि कुटुंबासाठी ती आता चित्रपट सृष्टीपासून लांब राहिली आहे.