Narendra Modi : भारतात सुशिक्षित तरुणांची मोठी संख्या आहे. दरवर्षी मोठ्या संख्येत तरुण पदवीधर होऊन बाहेर पडतात. मात्र, त्यातील खुप कमी जणांना नोकरी (Job alert 2022) लागते. अनेकांना सुशिक्षित असून देखील धक्के खावे लागतात. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशातील तरुणांना दिवाळीचं (Diwali 2022) गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे आता अनेकांच्या दिवाळी गोड जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi Rozgar Mela) आज देशातल्या 75 हजार तरुणांना दिवाळीचं गिफ्ट दिलं. 75 हजार तरुणांना नोकरीच्या नियुक्तीचं पत्र देण्यात आलं आहे. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधानांनी तरुणांशी संवाद साधला. तसेच पुढच्या दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत केंद्र सरकार 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याची घोषणा देखील मोदींनी केलीय. त्याचाच पहिला टप्पा आजपासून सुरू होतोय.
केंद्र सरकारने (Central Govt Job) दीड वर्षात तब्बल 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. त्यातील पहिला कार्यक्रम आज पार पडला. आज 75 हजार तरुणांना नोकरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलंय. केंद्रीय सशस्त्र बल, उपनिरिक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनो, तसेच आयकर निरिक्षक अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली होती.
आणखी वाचा - Diwali 2022: दिवाळीसाठी बेस्ट गिफ्ट; 500 रूपयांपेक्षा कमी बजेटमध्ये आहेत वस्तू
दरम्यान, 75 हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर देत पंतप्रधानांनी या तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे भरती बोर्डच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता आणखी 9 लाख 25 हजार तरुणांना येत्या काळात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तरुणाई देखील उत्सहात सण साजरा करताना दिसत आहे.