Digital Strike on Pakistan : भारताबाबत (India) कायमच गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) सरकारने कठोर कारवाई केलीय. पाकिस्तानच्या शाहबाज सरकारविरोधात (shahbaz sharif) भारताने मोठा 'डिजिटल स्ट्राइक' (Digital Strike) केला आहे. पीएफआयवरील (PFI) पाच वर्षांच्या बंदीच्या निषेधार्थ पाकिस्तानी दूतावासाच्या वतीने एक ट्विट (Tweet) करण्यात आले होते. सोशल मीडियावर कॅनडातील पाकिस्तानच्या दूतावासाने या कारवाईवर भारताचा विरोध केला आणि पीएफआयच्या (PFI) समर्थनार्थ भाष्य केले होते. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर (twitter) अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Digital Strike on Pakistan Shahbaz government Twitter account banned in India)
हे ट्विटर अकाउंट भारतातील ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आले आहे. कायदेशीर तक्रार आल्यानंतर असे पाऊल उचलल्याचे ट्विटरवरून सांगण्यात आले आहे. भारतातील देशविरोधी कारवायांना आळा घालण्याच्या दिशेने केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानच्या ट्विटर हँडलवर (@GovtofPakistan) बंदी घालण्याबाबत भारत सरकारकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर बंदी का घालण्यात आली याबद्दल अधिकृत माहितीची वाट पाहिली जात आहे.
मात्र कॅनडामधील पाकिस्तानच्या दूतावासाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पाकिस्तानच्या कान्सुलेट जनरल, व्हँकुव्हरच्या अधिकृत हँडलवरुन भारतात बंदी असलेल्या पीएफआयच्या समर्थनार्थ ट्विट करण्यात आलं होतं. या आक्षेपार्ह ट्विटसोबतच पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पाकिस्तान सरकारलाही टॅग करण्यात आले होते. या ट्विटविरोधात सोशल मीडियावर लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. ही पोस्टही चांगलीच व्हायरल झाली होती.