Bank Holidays : बँक 21 दिवस राहणार बंद, कोणत्या ठिकाणी कधी बंद असतील बॅंका, वाचा सविस्तर

Bank Holidays in October : जर तुम्ही या महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेत जात असाल तर सुट्टीची यादी एकदा नक्की पाहा. कारण या महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. विविध राज्यांमध्ये साजरे होणारे सण आणि कार्यक्रम यावर बँकिंग सुट्ट्याही अवलंबून असतात.

Updated: Oct 1, 2022, 11:37 AM IST
Bank Holidays : बँक 21 दिवस राहणार बंद, कोणत्या ठिकाणी कधी बंद असतील बॅंका, वाचा सविस्तर  title=

Bank Holiday in October :  सध्या सणासुदीला सुरुवात झाली आहे. दसरा जवळ आला असून लोकांनी दिवाळीची तयारी सुरू केली आहे. घरांची साफसफाई आणि रंगरंगोटी सुरू झाली आहे. जेव्हा जेव्हा सणासुदीचा काळ येतो तेव्हा अनेक सुट्ट्यांचे दिवस देखीस सुरू होतात. याच सणासुदीमुळे ऑक्टोबर महिन्यात अनेक सुट्ट्या आल्या आहेत. तुमच्याकडे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास ते लवकर पूर्ण करा. तसेच, तुम्ही ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही दिवशी बँकेत जात असाल तर सुट्ट्यांची यादी एकदा नक्की पहा. कारण या महिन्यात एकूण 21 दिवस बँका बंद राहणार आहेत. (Bank Holiday in October)

ऑक्टोबर महिन्याची सुरुवात 9 दिवसांच्या बँक सुट्टीने होत असून संपूर्ण महिन्यात एकूण 21 दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. आरबीआयच्या (RBI) ऑक्टोबर महिन्यातील सुट्टीच्या कॅलेंडरवर नजर टाकली तर या महिन्यात दुर्गापूजा, दसरा, दिवाळी, ईद यासह अनेक प्रसंगी बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. राज्य आणि शहरांमध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगळ्या असतात.

ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहणार आहे

राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवर बँकेच्या सुट्ट्या अवलंबून असतात. सणासुदीच्या काळात बँकांच्या शाखा बंद असल्या तरी या काळात तुम्ही बँकिंगशी संबंधित काम ऑनलाइन करू शकता. ही सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. तथापि, हे देखील लक्षात ठेवा की बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी सुरू असतात.

वाचा : Mumbai Crime News: दहीहंडीला घडलेल्या 'त्या' घटनेचा घेतला बदला; गोळीबारात एकाचा मृत्यू, तिघे जखमी

ऑक्टोबरमधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

1 ऑक्टोबर –बँक अर्धवार्षिक बंद (देशभर सुट्टी)

2 ऑक्टोबर – रविवार आणि गांधी जयंती सुट्टी

3 ऑक्टोबर – महाअष्टमी (दुर्गा पूजा) (अगरतला भुवनेश्वर, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पटना, रांचीमध्ये बँक बंद)

4 ऑक्टोबर – महानवमी/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव (अगरतला, बेंगळुरु, भुवनेश्वर, गुवाहाटी, कोलकाता, चेन्नई, गंगटोक, कानपूर, कोच्ची, कोलकाता, लखनऊ, पटना, रांची, शिलांग, तिरुवनंतपुरम भागांमध्ये सुट्टी)

5 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दशहरा (विजय दशमी) देशभरात सुट्टी

6 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (गंगटोकमध्ये सुट्टी)

7 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (गंगटोक बँक बंद राहणार)

8 ऑक्टोबर – दुसरा शनिवार मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (सुट्टी)

9 ऑक्टोबर – रविवार

13 ऑक्टोबर – करवा चौथ (शिमला इथल्या बँकांना सुट्टी)

14 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर)

16 ऑक्टोबर – रविवार

18 ऑक्टोबर – कटि बिहू (गुवाहाटी)

22 ऑक्टोबर – चौथा शनिवार

23 ऑक्टोबर – रविवार

24 ऑक्टोबर – नरक चतुर्दशी

25 ऑक्टोबर – लक्ष्मी पूजा

26 ऑक्टोबर – गोवर्धन पूजा

27 ऑक्टोबर – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / दीपावली / निंगोल चक्कूबा गंगटोक, इंफाल, कानपुर, लखनऊमध्ये सुट्टी)

30 ऑक्टोबर – रविवार

31 ऑक्टोबर– छठ पूजा (अहमदाबाद, रांची आणि पटनामध्ये सुट्टी)