Dharmaj Crop Guard: 'या' IPO ची तुफान कामगिरी, तुम्ही गुंतवणूक केलीत की नाही?

Dharmaj Crop Gaurd IPO Listed: सध्या शेअर बाजारात (share market) स्थिरता असली तरी मोठ्या प्रमाणात चांगली उसळी चार दिवसांनंतर पाहायला मिळते आहे. सध्या आयटी क्षेत्रापेक्षा बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. 

Updated: Dec 8, 2022, 12:06 PM IST
Dharmaj Crop Guard: 'या' IPO ची तुफान कामगिरी, तुम्ही गुंतवणूक केलीत की नाही?  title=
ipo news

Dharmaj Crop Gaurd IPO Listed: सध्या शेअर बाजारात (share market) स्थिरता असली तरी मोठ्या प्रमाणात चांगली उसळी चार दिवसांनंतर पाहायला मिळते आहे. सध्या आयटी क्षेत्रापेक्षा बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कुठल्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी अथवा कोणत्या आयपीओकडे लक्ष द्यावे यावर सर्वांची बारीक नजर आहे. नुकत्याच बाजारात आलेल्या एका आयपीओनं मोठी कामगिरी केलेली पाहायला मिळाली आहे. हा आयपीओ सध्या सगळीकडे धुमाकूळ घालतो आहे. या आयपीओचं नावं आहे धर्मज क्रॉप गार्ड (Dharmaj Crop Guard). या कंपनीचा आयपीओ गुरूवारी शेअर बाजारात लिस्टेड झाला. अहमदाबादच्या अॅग्रोकेमिकल कंपनी धर्मज क्रॉप गार्डच्या शेअर्सची BSE आणि NSE वर जोरदार लिस्ट झाली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईवर (BSE) 15.34 टक्क्यांनी वाढून 273.35 रूपयांवर लिस्ट झाला आहे. त्याच वेळी हा शेअर NSE वर 14.96% वर चढून 272.45 रुपयांवर पोहोचला. (dharmaj crop gaurd ipo alert listed 1st day share 14 percent preminum at 273 rupees)

किती आहे आयपीओची किंमत? 

या IPO ची किंमत ₹ 216-237 प्रति शेअर होती.हा आयपीओ लिस्ट झाल्याच्या काही तासांनंतर त्याच्या स्टॉकमध्येही वाढ झाली आहे. बीएसईवर स्टॉक (BSE stock) 16.05% वर चढून 275.05 रूपयांवर पोहोचला. गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर 38.05 रुपये नफा झाला आहे. याआधी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 256 रुपयांवर व्यवहार करत होते आणि प्री-ओपनिंग सेशनमध्ये 8.23 ​​टक्क्यांच्या वाढीसह होते. 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत खुला असलेला धर्मज क्रॉप गार्डचा IPO 35 वेळा सबस्क्राइब झाला होता.  

आवर्जून वाचा - LIVE Himachal Pradesh Election Result 2022 | भाजप 34, काँग्रेस 33 जागेवर आघाडी

कंपनी काय काम करते जाणून घ्या 

शेतकऱ्यांना उत्पादकता आणि नफा वाढवण्यात मदत करण्यासाठी ही कंपनी पीक संरक्षण उपाय लोकांसाठी प्रदान करते. कंपनी सोबतच 25 देशांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके, हर्बिसाइड्स, वनस्पती वाढ नियामक, सूक्ष्म खते आणि प्रतिजैविक यांसारख्या कृषी रासायनिक फॉर्म्युलेशनच्या विस्तृत श्रेणीची निर्यात करते. इलारा कॅपिटल (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.