कोल्हापूर : हुतात्मा राजगुरु यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध होता का, यावरून वाद रंगला असतानाच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच चिमटा काढलाय.
सोळाव्या शतकात रा. स्व. संघ नव्हता म्हणून बरं झालं... नाहीतर शिवाजी महाराजही संघाचेच असल्याचा दावा त्यांनी केला असता, असा टोला मुंडेंनी कोल्हापूरमध्ये बोलताना लगावला.
क्रांतिकारक शिवराम राजगुरू हे संघाचे स्वयंसेवक असल्याचा दावा माजी संघ प्रचारक नरेंद्र सहगल यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. राजगुरू हे मोहिते वाडा शाखेचे स्वयंसेवक असल्याचा दावाच या पुस्तकात करण्यात आला आहे.
भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता असं या पुस्तकांच नाव आहे. या पुस्तकात राजगुरू यांनी संघाच्या मुख्यालयाला नागपुरात भेट दिल्याचे उल्लेख आहेत.तसंच त्यांनी संघाचे संस्थापक हेडगेवारांची भेट घेतल्याचेही उल्लेख आला आहे. तर हेडगेवारांनी त्यांना पुण्यात न जाण्याचा सल्लाीह दिल्याचा उल्लेख आहे. तसंच ते स्वयंसेवक असल्याचे उल्लेख आहे. याआधी अशाच उल्लेखांचे पुस्तक 1960 सालीही संघाने प्रकाशित केलं होतं. राजगुरूंच्या मृत्यूनंतर हेडगेवार दु:खी ही झाले होते असंही या पुस्तकात म्हटलं आहे.
तर इतिहासकारांच्या मते यात काहीच तथ्य नाही. त्याकाळात राजगुरू संघाचे स्वयंसेवक असल्याचे उल्लेख कुठेच नाही. तर स्वातंत्र्यपूर्व चळवळीत संघाने आपलं नाव कुठेच पुढे येऊ दिलं नाही. गांधींच्या चळवळीतही संघाचे स्वयंसेवक होते. असंही या पुस्तकात म्हटलं आहे.