Crime News : विवाहित महिलेचे दीरासोबत शारीरिक संबंध असल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली असतील. यामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली तर काही संसार मोडले. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये महिलेने दीराच्या साथीने तिच्याच नवऱ्याला संपवलं आहे. विशेष म्हणजे तब्बल 4 वर्षांनी हा खून उघडकीस आला आहे. (Devar bhabi CMarathi Crime News)
नेमकं काय आहे प्रकरण?
चार वर्षांपूर्वी 28 सप्टेंबर 2018 ला पती बेपत्ता झाल्याची तक्रार गाझियाबादमधील नंदग्राम येथील सिक्रोड गावातील महिला दाखल करते. पत्नी सविताने सख्ख्या दीरावर संपत्तीसाठी बरवाईट केल्याचा संशय व्यक्त केलं होता. पोलिसांनी चौकशी केली, संशय आणखी बळवल्यावर घरात खोदकाम केलं मात्र तरीही हाती काही लागलं नाही. शेवटी बेपत्ता चंद्रवीरची फाईल बंद करण्यात आली होती.
पोलिसांनी हा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवला, त्यानंतर या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु करण्यात आला. या पथकाने वेगळ्या पद्धतीने तपासाला सुरूवात केली. चंद्रवीर आणि सविताच्या मुलीला विश्वासात घेत वडिलांच्या बेपत्ता होण्याबाबत विचारलं. इतक्या दिवस मनात ठेवलेल्या मुलीने क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना, स्वत:च्या आईवर आणि तिच्या चुलत चुलत्याबाबत माहिती दिली.
अरूण काका रात्री आईला भेटायला यायचा हे वडिलांना माहित झाल्यावर त्यांच्यात आणि आईमध्ये मोठा वाद झाला. वडिलांनी आईला त्यावेळी मारहाण केली होती. पोलिसांनी मुलीच्या सांगण्यावरून तिच्या आईला आणि अरूणला ताब्यात घेतलं. दोघेही आधी लवकर कबूल झाले नाहीत पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दोघांनी गुन्हा मान्य केला.
दोघांनी चंद्रवीरच्या हत्येचा कट रचला आणि त्याची हत्या केली. अरूणने त्याच्या आई-वडिलांना बाहेर गावी पाठवत घरात खड्डा खांदला. चार दिवस तो घरात खड्डा खोदत होता, खड्डा तयार झाल्यानंतर दोघांनी मिळून त्याचा मृतदेह खड्ड्यात पुरला होता. पोलिसांनी तो खड्डा उकरत सांगाडा बाहेर काढला. सुटलेल्या प्रकरणांची फाईल पुन्हा एकदा उघडली नसती तर या रहस्याचा पडदा कधीच उलगडला नसता.