Video : गर्भवती महिलेला रेस्टॉरंटमध्ये आल्या कळ्या आणि मग डॉक्टर बनले 'थ्री इडियट्स'

Health Tips for Pregnant : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Social media shocking Video) समोर आला आहे. यात गर्भवती महिला रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जाते आणि तिला कळ्या येतात...

Updated: Nov 15, 2022, 04:43 PM IST
Video : गर्भवती महिलेला रेस्टॉरंटमध्ये आल्या कळ्या आणि मग डॉक्टर बनले 'थ्री इडियट्स' title=
Video Woman Childbirth in Restaurant viral on social media nmp

Woman Childbirth Video  : नवरा-बायकोसाठी (husband and wife)आयुष्यातील दुसरा टप्पा म्हणजे आई-वडील (mother - father) होणं. हा क्षण प्रत्येकासाठी खूप खास असतो. घरात कोणी गर्भवती महिला (Pregnant women) असेल तर आपलं सगळं लक्ष तिच्याकडे असतं. प्रत्येक जण तिला सल्ला देतं असतो. हे करु नकोस ते करु नकोस, घराबाहेर जास्त जाऊन नकोस अशा अनेक गोष्टी तिला सांगितल्या जातात. आजची महिला ही नोकरीवर (Working women) जाते त्यामुळे तिला घराबाहेर पडावंच लागतं. गर्भवती महिलेला सतत काळजी असते आपलं ती आपली प्रसुती नीट झाली पाहिजे. पण बाळ जन्माला कधी येणार याचा फार काही अंदाज लावता येतं नाही. डॉक्टर एक साधारण तारीख आपल्याला सांगतात. त्यामुळे त्या दिवसांमध्ये महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पण सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ (Social media shocking Video) समोर आला आहे. यात गर्भवती महिला रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जाते आणि तिला कळ्या येतात...

अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ

झालं असं की, एक गर्भवती महिला तिच्या नवऱ्यासोबत एका रेस्टॉरंटमध्ये जातं. तिथे ते दोघे खाण्यासाठी ऑर्डर देतात. महिलेसाठी लेमन सोडा मागविला जातो. ती तो प्यायला घेते आणि तेवढ्यात त्या महिलेला कळ्या सुरु होतात. त्या ठिकाणी असलेले इतर लोक लगेचच त्यांचा मदतीला येतात. एक व्यक्ती लगचेच डॉक्टरांना (Doctor) फोन करतो. (Video Woman Childbirth in Restaurant viral on social media nmp)

मग डॉक्टर बनले 'थ्री इडियट्स'

पुढे व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता महिलेच्या प्रसुती कळ्या वाढत जातात. तिला असह्य त्रास होतो...आता महिलेची डिलिव्हरी रेस्टॉरंटमध्येच करायची वेळ आली. महिलेला टेबलवर झोपलं जातं...काही वेळात तिथे एक डॉक्टर आणि नर्स महिलेची मदत करण्यासाठी पोहोचतात. मग काय डॉक्टर बनले 'थ्री इडियट्स' (3 Idiots)...त्यांनी रेस्टॉरंटमध्ये महिलेची प्रसुती केली आणि त्या महिलेला मुलगी झाली.  

व्हिडीओमागील सत्य 

खरं तर हा व्हिडीओ गर्भवती महिल्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉम यूट्यूबवर Awareness Video नावाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.