ही व्यक्ती सांभाळणार राम रहीमचा "डेरा"

बलात्कार प्रकरणात दोषी असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला तब्बल २० वर्षाची शिक्षा झाली आहे. डेरा प्रमुख जेलमध्ये गेल्यानंतर आता लोकांमध्ये चर्चा आहे की, हे एवढे मोठे साम्राज्य नक्की सांभाळणार कोण?

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 5, 2017, 03:56 PM IST
ही व्यक्ती सांभाळणार राम रहीमचा "डेरा" title=

नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात दोषी असलेला डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमला आता तब्बल २० वर्षाची शिक्षा झाली आहे. डेरा प्रमुख जेलमध्ये गेल्यानंतर आता लोकांमध्ये चर्चा आहे की, हे एवढे मोठे साम्राज्य नक्की सांभाळणार कोण?

राम रहीमच्या उत्तराधिकारी म्हणून त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतचं नाव घेतलं जातं होतं. तर काही लोकं त्याचा मुलगा जसमीत त्याचा उत्तराधिकारी असल्याचं म्हणत होते. मात्र आता डेऱ्याची कमान सांभाळण्यासाठी एक आणखी एक करणार नाव समोर आलं आहे. त्यामुळे लोकांची उत्सुकता ताणली गेली आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना डेरा सच्चा सौदाचा चेअरपर्सन विपासनाने उत्तराधिकारीच्या बाबतीतील माहिती दिली.  राम रहीमनंतर नंबर दोनवर असणाऱ्या विपासनाने केलेल्या दाव्यानुसार हनीप्रीतचा डेरा सच्चा सौदाशी काहीही संबंध नाही. विपासनाचं असं देखील म्हणणं आहे की हनीप्रीतचा डेऱ्याशी तेव्हाच संबंध तुटला जेव्हा २५ ऑगस्ट रोजी बाबाला दोषी ठरवण्यात आलं होतं. 

हनीप्रीतच्या पळून जाण्याबाबत विचारल्यास विपासनाने सांगितले की आता तिने पोलिसांसमोर सरेंडर व्हावे. २८ ऑगस्टला राम रहीमला जेल झाल्यानंतर रहीम आणि हनीप्रीतबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या. हनीप्रीत ही बाबा राम रहीमची मानलेली मुलगी होती. मात्र हनीप्रीतचा पती विश्वास गुप्ताने राम आणि रहीमच्या शारिरीक संबंधाबाबत गौप्य स्फोट केला होता.