रोहतक : बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेला गुरमित राम रहीम सिंह आता २० वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात आहे. पण गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे नवनवे किस्से समोर येत आहेत.
रहीम भक्तांना भगवानचा दूत असल्याचे सांगत असे. धर्माच्या नावाखाली तो लोकांना लुबाडत असे, त्यांना ब्लॅकमेल करत असे. एवढंच नाही तर डेऱ्याच्या आसपासच्या परिसरात भाज्या लावून अगदी सोन्याच्या दरात या भाज्या प्रसाद म्हणून भक्तांना विकत असे. हा सगळा प्रकार इतका धक्कादायक आहे की वाचल्यावर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही.
राम रहीमचा हा डेरा ७०० एकर परिसरात पसरलेला आहे. जिथे तो हजारो प्रकारची शेती करत असे. बाबाच्या या शेतातील भाज्या इतक्या महाग होत्या की अशा महाग भाज्या कोणत्याही मंडईत आपल्याला पाहायला मिळणार नाही. एवढंच काय तर आपल्या मनाला वाटेल अशा दरात भाजी विकणारा हा बाबा भक्तांना प्रसाद असल्याचं सांगून लुबाडत असे.
एक हिरवी मिरची - १ हजार रुपये
मटरचे ५ दाणे पॅकेटमध्ये - १ हजार रुपये
अर्धा किलो मटर - लाख रुपये
एक पपई - ५ हजार रुपये
एक छोटे वांगे - १ हजार रुपये
मोठे वांगे - १ हजारहून अधिक रुपये
२ टॉमेटो - २ हजार रुपये
अशा प्रकारे राम रहीम आपल्या अंध भक्तांना भाज्या विकत असे. एवढंच काय तर या भाज्या भक्तांना घरपोच केल्या जात असे. ही जबाबदारी भंगीदासवर सोपवण्यात आली होती. भंगीदास डेऱ्यातील चर्चा घरात सूत्रसंचालन करत असे.
यासाठी एवढ्या महाग भाज्या खरेदी करत
अंध भक्तांना असे वाटे की, आपल्या बाबाने ही भाजी स्वतः लावली आहे. आणि प्रसादच्या रुपात ही भाजी प्रत्येकाने खाल्ली पाहिजे. त्यामुळे या भाज्यांचे दर अव्वाचे सव्वा असले तरीही ते आनंदाने खरेदी करत.