नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम याला न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्याला १० वर्षांची शिक्षाही झाली. बाबाला झालेली ही शिक्षा कायदेशीर असली तरी, यातून बाहेर पडण्यासाठी बाबालाही कायदेशीर पर्यांयांचा मार्ग उपलब्ध असल्याची चर्चा आहे. जर बाबाने हा मार्ग वापरायचे ठरवले तर, त्याच्यासमोर कोणकोणते पर्याय असू शकतात...?
कलम ३७६ अन्वये राम रहिम याला १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, चर्चा आहे की, बाबा राम रहिमचे वकील यावर शांत बसणार नाहीत. ते सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू शकतात.
- बोलले जात आहे की, प्रकृती अस्वस्थ्याचे कारण देत बाबा कोर्टाकडे जामीन मागू शकतो. तसेच, तुरूंगाबाहेर आल्यावर तो न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो.
- बाबा राम रहिम याच्याकडे सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्यासाठी आज (सोमवार) तरी कोणतीच संधी नाही. दरम्यान, उच्च न्यायालयाचा निर्णय यायला सोमवारी बराच उशीर झाला. त्यामुळे त्याच्याकडे सुप्रीम कोर्टात जायला वेळच राहिला नाही. त्याला जर सुप्रीम कोर्टाकडे दाद मागायची असल्यास तो उद्या (मंगळवार) अपील करू शकतो.
- राम रहिमने जर मंगळवारी सुप्रीम कोर्टाकडे अपील केले तर, कोर्ट हे अपील दाखल करून घेऊ शकते. अपील दाखल केल्यावर कोर्ट त्याच दिवशी आपला निर्णय देऊ शकते. मात्र, आतापर्यंतचा इतिहास पाहता कोर्ट किमान दोन दिवसांचा अवधी घेते. निर्णय कधी द्यायचा हे ठरविण्याचा कोर्टाला अधिकार आहे.
- राम रहिमबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्ट स्थगितीचा निर्णयही देऊ शकते. मात्र, हा निर्णय द्यायचा की नाही, याचा अधिकार कोर्टालाच आहे. या प्रकाराला 'सस्पेंन्शन ऑफ कोर्ट' असे म्हणतात. राम रहिमला कोर्टाकडून दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण तो बाहेर आल्यास कोर्टाबाहेरील वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
- आणखी एका गोष्टीची भीती व्यक्त केली जात आहे की, राम रहिम एकदा का कारागृहाबाहेर आला तर, त्याला पुन्हा कारागृहात टाकणे हे मोठे आव्हान असेन. पण, मुळात तो बाहेर येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण त्याच्यावर बलात्कारासोबतच हत्या आणि इतरही गुन्हे आहेत.