मुलीचा मृत्यू झाला तरी पत्ता नाही; मृतदेहासोबतच आईने काढले तीन दिवस, अखेर...

Crime News In Marathi: चेन्नईतून एक धक्कादायक घटना घडली आहे. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली महिला तिच्या मुलीच्या मृतदेहासह तीन दिवस राहत होती.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 18, 2023, 02:36 PM IST
मुलीचा मृत्यू झाला तरी पत्ता नाही; मृतदेहासोबतच आईने काढले तीन दिवस, अखेर...  title=
Depressed 84 year old woman lives with dead daughter for days

Crime News Today:  84 वर्षीय वृद्ध महिला तब्बल तीन दिवस मुलीच्या मृतदेहासोबत राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चेन्नईतील मनाली न्यू टाउनमध्ये मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. (Depressed woman lives with dead daughter) 

आई 55 वर्षीय मुलीच्या मृतदेहासोबत राहत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर लगेचच त्यांनी घटनास्थळी धाव घेत वृद्धेला घराच्या बाहेर काढले आहे तर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला ही अविवाहित असून ती तिच्या आई जास्मिनसोबत राहत होती. शीलाची आई मनोरुग्ण असून तिच्यावर उपचार सुरू होते. तर, तिचे वडिल MTCमध्ये नोकरी करत होते. तर पाच वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघीजणी मनाली येथील घरात एकट्याच राहत होत्या. 

मंगळावरी शेजाऱ्यांच्या लक्षात आले की घर आतून बंद करण्यात आले होते. बऱ्याचदा शेजाऱ्यांनी दार ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. शेवटी त्यांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची पाहणी करत शीलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर, जास्मिन यांची चौकशीदेखील करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्मिन यांना त्यांच्या मुलीचा मृत्यू झालाय याबाबत माहितच नव्हती. त्या रोजच्या प्रमाणे घरातील कामे करत होत्या . त्यांची मुलगी झोपली आहे, असंच त्यांना वाटत होतं. त्या मानसिक रुग्ण असून त्यांना तीन दिवसांपूर्वी काय घडलं काहीच आठवत नव्हतं. 

पोलिसांनी शीलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. शविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर शीलाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. काही चौकशी केल्यानंतर शीलाला आधीपासूनच आरोग्यासंबंधीत तक्रारी होत्या. त्यामुळंच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक असावा , अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.