दिल्लीत वाघिणीचा मृत्यू; कोरोना चाचणीसाठी पाठवले रक्ताचे नमुने

आता तिच्या चाचणीचा अहवाल.... 

Updated: Apr 24, 2020, 09:59 PM IST
दिल्लीत वाघिणीचा मृत्यू; कोरोना चाचणीसाठी पाठवले रक्ताचे नमुने  title=
छाया सौजन्य- एएनआय

नवी दिल्ली : दिल्लीतील प्राणी संग्रहालयात बुधवारी एका १४ वर्षीय वाघिणीचा मृत्यू झाला. किडनीमध्ये बिघाड झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. पण, आता मात्र त्या वाघिणीच्या रक्ताचे नमुने बरेली येथे कोरोना व्हायरसच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यानंतर आता तिच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याचं वृत्त एएनआयने प्रसिद्ध केलं आहे. 

'किडनी खराब झाल्यामुळे १४ वाघिणीचा बुधवारी मृत्यू झाला. कल्पना असं त्या वाघिणीचं नाव. तिचं पार्थिव दुसऱ्या दिवशी रितसर पुरण्यातही आलं. पण, आम्ही तिच्या रक्ताचे नमुने घेतले असून, ते चाचणीसाठी बरेली येते पाठवले आहेत',  अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली होती. 

दरम्यान, तीन प्राणी आरोग्य संस्थांना या चाचणीसाठीची परवानगी मिळाली आहे. ज्यामध्ये भोपाळ येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी ऍनिमल डिसिस (NIHSAD), हिसार येथील नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ इक्विन्स (NRCE) आणि बरेलीच्या इंडियन वेटनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमधील ऍनिमल डिसिस रिसर्च डायग्नॉस्टीक (CADRAD)चा समावेश आहे.

 

बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या वाघिणीचा मृत्यू झाला. ज्यानंतर गुरुवारी तिच्या पार्थिवाला पुरण्यात आलं. नियमांमुसार यावेळी कमीत कमी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. अमेरिकेत अवघ्याच चार वर्षांच्या वाघाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर नॅशनल टायगर रिझर्व अर्थात NTCAने एक संक्षिप्त पत्र लिहित व्याघ्र प्रकल्प क्षेत्र असणाऱ्या राज्यांत वाघांमध्ये कोरोनाची लक्षण दिसणाचं जातीने निरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय पॉझिटीव्ह आढळलेल्या प्राण्यांवर तातडीने उपचार करण्याचाही इशारा दिला आहे.