दिल्ली हिंसाचार : ज्यांची घरे जळली आहेत त्यांना रोख २५ हजार - केजरीवाल

दिल्ली हिंचाराचात (Delhi violence) ज्या व्यक्तींची घर जळली आहेत त्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.

Updated: Feb 28, 2020, 11:11 PM IST
दिल्ली हिंसाचार : ज्यांची घरे जळली आहेत त्यांना रोख २५ हजार - केजरीवाल title=

नवी दिल्ली : दिल्ली हिंचाराचात (Delhi violence) ज्या व्यक्तींची घर जळली आहेत त्यांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) सरकारने दिले आहे. पत्रकार परिषद घेऊन ज्या व्यक्तींचे घर जळली त्यांना २५-२५ हजार रोख देण्याची घोषणा केजरीवाल सरकारने केलीय. शनिवारी दुपारपासून ही रक्कम कुटुंबाना देण्यात येणार आहे. तसंच ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी नॉर्थ ईस्ट दिल्लीच्या डीएमशी तातडीने संपर्क करावा, असेही केजरीवाल यांनी सांगितले. 

दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ४२ जणांचे बळी गेले आहेत.तर अडीचशे जण जखमी झाले आहेत. दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ६३० जणांना अटक आणि ताब्यात घेण्यात आले आहेत. फॉरेन्सिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दंगलग्रस्त भागाची पुन्हा पाहणी केली आहे. दिल्लीमध्ये एकीकडे हिंसाचार होत असताना दुसरीकडे काही मुस्लिम नागरिक शांततेसाठी प्रयत्न करीत आहेत. जामा मशिदीमध्ये आज शुक्रवारचं नमाज पठण केलं. यावेळी अनेक मुस्लिम नागरिक हातात तिरंगा घेऊन आले होते. त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे. दिल्लीत शांतता प्रस्थापित होण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. 

दिल्लीमधील हिंसाचारानंतर दररोज एकेक नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. दुकानं, घरं, गाड्याच नव्हे, तर शाळांनाही दंगेखोरांनी लक्ष्य केले आहे. आपल्या शाळेमध्ये हिंसाचारानं नंगा नाच घातल्याचं एका चिमुरड्याला समजलं आणि त्यानं शाळेत धाव घेतली.. त्याला जे दिसलं ते भीषण होते.

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयानं पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता एस. एन. श्रीवास्तव काम पाहणारेत. श्रीवास्तव सध्या दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम पाहतात. उद्यापासून ते दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारतील.