नवी दिल्ली : कन्हैय्या कुमार याच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी दिल्ली सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे देशद्रोहाच्या प्रकरणात कन्हैया कुमार अडचणीत आला आहे. जेएनयूच्या एका कार्यक्रमात देशद्रोही घोषणा दिल्याचा आरोप आहे. तसेच पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.
#BreakingNews । दिल्ली सरकारने कन्हैय्या कुमार याच्याविरूद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे देशद्रोहाच्या प्रकरणात कन्हैया कुमार अडचणीत आला आहे. जेएनयूच्या एका कार्यक्रमात देशद्रोही घोषणा दिल्याचा त्याच्यावर आरोप असून गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. pic.twitter.com/adSCAVSuDJ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 28, 2020
जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीआयचा नेता कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जाणार आहे. दिल्ली सरकारने हा खटला चालवण्यास मंजुरी दिलीय. त्यामुळे कन्हैया कुमारच्या अडचणी वाढणार आहेत. कन्हैया कुमारची फाईल दिल्ली सरकारकडे पडून होती.
२०१६ मध्ये जेएनयू परिसरात देशविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल करून वर्षाभरापूर्वीच आरोपपत्र दाखल केले होते.