तिच्यापासून दूर राहा...; त्या वाक्यामुळंच गेला पीडितेचा जीव, दिल्ली हत्याकांडात आणखी एकाची एन्ट्री

Delhi Murder Case Update: दिल्ली हत्याकांडात आता आणखी एकाची एन्ट्री झाली आहे. आरोपी साहिलने पीडितेची हत्या का आली याचा खुलासा केला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 31, 2023, 03:03 PM IST
तिच्यापासून दूर राहा...; त्या वाक्यामुळंच गेला पीडितेचा जीव, दिल्ली हत्याकांडात आणखी एकाची एन्ट्री title=
Delhi Murder Case Jhabru claims avoiding Sakshi led to her murder

Delhi Murder Case: दिल्ली हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांनी आरोपील साहिलला अटक केली आहे. साहिलच्या अटकेनंतर त्याच्या जबाबातून या हत्यांकाडात नवीन खुलासा समोर आला आहे. साक्षीच्या जुन्या मित्रासोबत वाढती जवळीकीमुळं तिची हत्या केल्याचा जबाब साहिलने पोलिसांजवळ दिला आहे. तसंच, आरोपीने आणखी एकाचे नाव या सर्व प्रकरणात घेतलं आहे. 

दिल्लीत भररस्त्यात १६ वर्षांच्या मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आरोपीने पीडितेवर चाकूने तब्बल २०पेक्षा अधिक वार केले होते. नंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. तर, जेव्हा हा गुन्हा घडत होता तेव्हा लोकं दुर्लक्ष करुन पुढे जात होते. त्यामुळं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली आहे. साहिलची कसून चौकशी सुरू असताना त्याच्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साहिल चौकशीदरम्यान वारंवार जबाब बदलत आहे. त्याने अलीकडेच पोलिसांना पीडितेची अलीकडेच अजय उर्फ झबरू नावाच्या एका मुलासोबत मैत्री झाली होती, अशी माहिती दिली. 

झबरू या त्या परिसरातील भाई असल्याचा दावा साहिलने केला आहे. झबरुसोबत मैत्री झाल्यानंतर पीडितेने साहिलसोबत मैत्री तोडली होती. मात्र तो सातत्याने तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता. घटना घडण्याच्या एकदिवस आधी पीडिता तिची मैत्रीण भावना आणि झबरूसोबत साहिलला भेटली होती. साहिल सातत्याने तिचा पाठलाग करत असल्याने तिघांनी मिळून त्याला समज दिली होती. 

साहिलला झबरूनेदेखील पीडितेपासून लांब राहा, अशी धमकी दिली होती. त्यानंतरच साहिलने साक्षीला ठार करण्याचा निर्णय घेतला. झबरुने दिलेल्या धमकीमुळं साहिल संतापला होता आणि त्यातूनच त्याने पिडीतेला संपवण्याचा कट रचला. दरम्यान, पोलिस साहिलच्या जबाबाची सत्यता पडताळत आहे. 

पोलिसांनी मंगळवारी सकाळी आरोपीची मेडिकल चाचणी केल्यानंतर त्याला रोहिणी कोर्टात नेले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. यादरम्यान पोलिस गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू प्राप्त करण्याच्या प्रयत्नात आहे. 

साहिलवर दाखल आहे मारहाणीचा गुन्हा

दिल्ली हत्याकांडातील आरोपी साहिलवर याआधीही एक गुन्हा दाखल आहे. तो स्थानिक मुलांसोबत गँग बनवून अनेकांसोबत मारपीट करत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अल्पवयीन असताना त्याने एकावर गोळीही झाडली होती, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केली नाहीये. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x