नवी दिल्ली : लग्नानंतर नवऱ्याने पत्नीच्या मनाविरुद्ध ठेवलेले शारीरिक संबंध हा अपराध मानावा की नाही यावरून गेल्या काही दिवसात बरेच मतमतांतर आहेत. याबाबत वेगवेगळी मतंही मांडली जात आहेत. मॅरिटल रेप हा अपराध मानावा की नाही याबाबतही मतमतांतरे पाहायला मिळत आहे.
दिल्ली हायकोर्टात आज याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी होत आहे. मात्र तिथेही कोणाचीही मतं एकसारखी नसल्याने आता हा वाद सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.
जस्टिस राजीव शकधर आणि जस्टिस हरिशंकर राय यांनी मांडलेली मतं वेगवेगळी आहेत. त्यामुळे आता हा वाद सुप्रीम कोर्टात जाणार आहे. जज जस्टिस राजीव शकधर यांच्या मतानुसार पतीविरुद्ध रेपचा खटला चालवू शकत नाही.
जज जस्टिस हरिशंकर हे शकधर यांच्या मताशी सहमत नाहीत. तो अपराध मानला जाऊ शकतो त्यामुळे अखेर याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात अपील करावी असा सल्लाही देण्यात आला आहे.
आता मॅरीटल रेपचा वाद सुप्रीम कोर्टात जाणार का? सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय देणार? असलेल्या आधीच्या कायद्यात काही बदल करणार का? अशा अनेक प्रश्नांवर उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.