Crime News : गुरुवारी दिल्ली-पुणे स्पाईसजेट फ्लाइटमध्ये ( SpiceJet flight) बॉम्ब असल्याच्या (bomb threat) धमकीचा निनावी फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संध्याकाळी 6.30 वाजता हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Delhi IGI Airport) उड्डाण करणार होते. बॉम्बच्या धमकीचा फोन आल्यावर, एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी आणि बॉम्बशोधक पथकाला बोलावले. यानंतर तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. यानंतर आता या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सर्व 182 प्रवासी आणि क्रू मेंबर्सना खाली उतरवल्यानंतर विमानाची कसून तपासणीही केली. विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू नसल्याची खात्री केल्यानंतर, स्पाइसजेटचे सुरक्षा व्यवस्थापक वरुण कुमार यांनी पोलीस तक्रार दाखल केली. दिल्ली पोलिसांनी ( Delhi Police) धमकी आलेल्या फोन क्रमांकाचा शोध घेत एका आरोपीला अटक केली आहे. तर अन्य दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पुण्याला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाने टेकऑफपूर्वी बॉम्बची धमकी दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी द्वारका येथील अभिनव प्रकाश (24) याला अटक केली आहे. स्पाईसजेटच्या विमानाने दिल्लीहून निघालेल्या मैत्रिणींसोबत त्याच्या मित्रांना अधिक वेळ घालवता यावा म्हणून त्याने हा फोन केल्याचे प्रकाशने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी द्वारका येथे छापा टाकत प्रकाशला अटक केली.
पोलिसांच्या चौकशीत अभिनव प्रकाशने (Abhinav Prakash) सांगितले त्याचे मित्र राकेश उर्फ बंटी आणि कुणाल सेहरावत नुकतेच मनालीला गेले होते. मनालीला त्यांची दोन स्थानिक मुलींसोबत मैत्री झाली. या दोन्ही मुली स्पाईसजेटच्या विमानाने पुण्याला निघाल्या होत्या. पण प्रकाशच्या मित्रांनी त्याला सांगितले की त्यांना त्यांच्या मैत्रिणींसोबत आणखी काही वेळ घालवायचा आहे. यानंतर त्यांनी विमानाचे उड्डाण उशीरा होण्यासाठी एक प्लॅन आखला.
त्यानंतर तिघांनी स्पाईसजेट एअरलाइन्सच्या कॉल सेंटरवर बनावट फोन करत विमानामध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यांना वाटले की अशाने विमानाचे उड्डाण रद्द होईल. प्रकाशने त्याच्या मोबाईलवरून स्पाईसजेटला फोन करत फ्लाइट क्रमांक SG-8938 मध्ये बॉम्ब आहे असा मेसेज दिला. स्पाइसजेटच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांने फोन उचलणे बंद केले.
त्यानंतर प्रकाशने फ्लाइटमध्ये बसलेल्या मैत्रिणींना बाहेर बोलावले आणि विमान रद्द होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले तेव्हा सर्वांना आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र आता पोलिसांनी प्रकाशला अटक केली आहे. अभिनव प्रकाशला अटक झाल्याचे समजताच त्याच्या दोन मित्रांनी घरातून पळ काढला. सध्या ते फरार असून पोलीस आता त्यांचा शोध घेत आहेत. प्रकाश गेल्या सात महिन्यांपासून गुरुग्राममधील डीएलएफ कुतुब प्लाझा येथे ब्रिटिश एअरवेजमध्ये म्हणून कामाला आहे.