पप्पा मम्मी त्याच्यासोबत अश्लिल बोलते... लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीने तरुणाला बोलवून मुलीवर केला अत्याचार

Crime News : लष्करी अधिकाऱ्याच्या 15 आणि 11 वर्षाच्या मुलांसोबत गैरकृत्य केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याचा तपास सुरु केला आहे

Updated: Feb 19, 2023, 05:04 PM IST
पप्पा मम्मी त्याच्यासोबत अश्लिल बोलते... लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीने तरुणाला बोलवून मुलीवर केला अत्याचार title=

Crime News : देहरादूनमध्ये (Dehradun) एका आईने स्वतःच्याच मुलांसोबत अश्लिल कृत्य केल्याचे समोर आले आहे. लष्करी अधिकाऱ्याच्या (Army Officer) पत्नीने एका तरुणाला घरी बोलवून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करायला सांगितला. यानंतर तरुणाने मुलावरही बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तरुणाने मुलीचे जबरदस्तीने धर्मांतर (conversion) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. देहरादून पोलिसांनी (Dehradun Police) याप्रकरणी गुन्हा नोंदवून आरोपीचा तपास सुरु केला आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. 

केंट परिसरात राहणाऱ्या एका लष्करी अधिकाऱ्याने बिहारमधील एका तरुणावर आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आरोपीने मुलीवर धर्म बदलण्यासाठी दबावही टाकला. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तक्रारदार लष्करी अधिकाऱ्याला 15 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. देहरादून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करात तैनात असलेल्या जेसीओने ही तक्रार दिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची तनवीर आलम नावाच्या तरुणासोबत एका सिंगिंग अॅपच्या माध्यमातून  ओळख झाली होती. त्यावेळी लष्करी अधिकारी हा एका कोर्ससाठी महाराष्ट्रात आला होता. यादरम्यान पत्नीने तनवीरला घरी बोलावले होते. पत्नी तनवीरसोबत अश्लील बोलायची. मुलीने याबाबत वडिलांना माहिती दिली. मुलीने अनेकवेळा तनवीरला तिच्या आईसोबत अश्लील कृत्य करताना पाहिले होते. यानंतर त्याने मुलीवर बलात्कार केला आणि मुलासोबतही गैरकृत्य केले, असा आरोप लष्करी अधिकाऱ्याने केला आहे.

दरम्यान, लष्करी अधिकारी महाराष्ट्रातून घरी परतल्यानंतर मुलगी घाबरल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर अधिकाऱ्याने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विनय कुमार यांनी दिली.