संरक्षण मंत्र्यांनी शहीद औरंगजेबच्या कुटुंबाची भेट घेतली

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज शहीद जवान औरंगजेबच्या कुटुबीयांची भेट घेतली.

Updated: Jun 20, 2018, 05:22 PM IST

श्रीनगर : संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज शहीद जवान औरंगजेबच्या कुटुबीयांची भेट घेतली. शहीद औरंगजेब राष्ट्रीय रायफलचे जवानाचे अपहरण करून त्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. रमझान ईदेच्या पहिल्या दोन दिवस आधी झालेल्या या घटनेनंतर साऱ्या काश्मीरमध्ये  संताप व्यक्त करण्यात आला. पूँछ जिल्ह्यातल्या सलानी या औरंगजेब यांच्या मूळ गावात असणाऱ्या त्यांच्या घरी सीतारमण लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांसोबत पोहचल्या. यावेळी स्वतः माजी सैनिक औरंगजेबच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या बलिदानाविषयी अभिमान असल्याचं सीतारमण यांना सांगितलं. हे कुटुंब साऱ्या देशासाठी प्रेरणास्त्रोत आहे असं सीतारमण यांनी यावेळी म्हटलंय.