महापौरपदाच्या उमेदवाराचा फक्त 1 मताने पराभव

एका वॉर्डाचा निकाल चर्चेत 

Updated: Dec 16, 2020, 05:53 PM IST
महापौरपदाच्या उमेदवाराचा फक्त 1 मताने पराभव title=

कोच्ची : केरळमध्ये झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकीचा मतमोजणी संपली आहे. लेफ्च आघाडीने आघाडी कायम ठेवली आहे. या निवडणुकीसाठी एनडीएने कंबर कसली होती. कोच्ची (Kochi)मधील एका वॉर्डाचा निकाल हा चर्चेत आला आहे. काँग्रेसच्या उमेदवाराचा येथे फक्त 1 मताने पराभव झाला आहे. नॉर्थ आयलँड वॉर्डात काँग्रेसचे महापौरपदाची उमेदवार एन वेनुगोपाल यांना भाजपच्या उमेदवाराने 1 मताने पराभूत केलं आहे.

भाजपकडून 1 मताने पराभव झाल्यानंतर एन वेनुगोपाल यांनी म्हटलं की, 'ही जिंकलेली जागा होती. मी नाही सांगू शकत की काय झालं. पक्षात समस्या नव्हती. समस्या वोटिंग मशीनमध्ये असेल. यामुळे भाजपचा विजय झाला असेल. मी अजून कोर्टात जाण्याबाबत विचार केलेला नाही. आधी मी हे तपासतो की नेमकं काय झालं.'

केरळमध्ये दुपारपर्यत झालेल्या मतमोजणीत 941 पैकी ग्रामपंचायती पैकी एलडीएफ 522, यूडीएफला 363 आणि एनडीएला 23 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला आहे.