ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव, रेल्वे मंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा

 Odisha Train Accident : ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.  रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले आहे. मृत्यांचा आकडा वाढला असून  261 वर पोहोचला आहे.

Surendra Gangan Updated: Jun 3, 2023, 02:33 PM IST
ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव, रेल्वे मंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशीची घोषणा title=
Coromandel Express Accident : Odisha Train Accident

Coromandel Express Accident : ओडिशाच्या रेल्वे अपघातात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले आहे. ( Odisha Train Accident) तीन रेल्वे धडकल्याने झालेल्या अपघातात 261 ठार तर 900 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. हा मोठा अपघात आहे. या रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

रेल्वेमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

बालासोर येथील घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हा मोठा अपघात आहे. आम्ही सर्व दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करतो. काल रात्रीपासून रेल्वेचे पथक, एनडीआरएफ, एसडीआरएफ बचाव कार्यात गुंतले आहेत. या दुर्घटनेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला त्यांच्या दु:खात सहभागी आहे. सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल.

ओडिशात तीन रेल्वेच्या धडकेत किमान 261 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 900 लोक जखमी झाले. बेंगळुरु-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बालासोर येथे मालगाडीचा भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त रेल्वे डब्यांमध्ये अडकलेले प्रवासी आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव आणि मदतकार्य सुरुच आहे. दरम्यान, बालासोर आणि आसपासच्या वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. एससीबीएमसीलाही सतर्क करण्यात आले आहे.

बालासोर येथील रुग्णालयात रक्तदानासाठी गर्दी

ओडिशातील बालासोर रेल्वे दुर्घटनेनंतर रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी स्थानिक लोकांची गर्दी दिसून आली. इथे लोक माणुसकीचे चागले उदाहरण दाखवून देत आहेत.  

 

हेल्पलाइन क्रमांक जाहीर

ओडिशा सरकारने एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे - 06782-262286. इतर हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत:-

भद्रक : 8455889900

जाजपूर केनिहार रोड: 8455889906

कटक: 8455889917

भुवनेश्वर: 8455889922

खुर्दा रोड: 6370108046

बेरहामपूर: 89173887241

बालुगाव : 9937732169

पलासा: 8978881006

हावडा हेल्पलाइन क्रमांक: 033-26382217

खरगपूर हेल्पलाइन क्रमांक: 8972073925 आणि 9332392339

बालासोर हेल्पलाइन क्रमांक: 8249591559 आणि  7978418322

शालिमार हेल्पलाइन क्रमांक: 9903370746