Accidental News : अंघोळीसाठी गेलेली महिला बाहेर आलीच नाही. कारण तिच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला, अंघोळीसाठी गेली आणि बराच वेळ झाला पण बाहेर आली नाही म्हणून दरवाजा वाजवला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही शेवटी घरच्यांनी दरवाजा तोडला पण पाहतात तर काय संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. (death of a female hotel manager who went for a bath marathi News)
नेमकं काय घडलं?
हॉटेल मॅनेजर महिला रोजच्यासारखी संध्याकाळी काम संपवून घरी येते. त्यानंतर अंघोळीसाठी जाते मात्र आत गेल्यावर बराच वेळ झाला तरी ती बाहेर येत नाही. घरचे थोडावेळ वाट पाहतात मात्र त्यांच्या मनात अनेक गोष्टी येऊ लागतात. शेवटी राहवत नाही म्हणून ते दरवाजा ठोठावतात.
दरवाजा ठोठावल्यावर आतमध्ये गेलेली महिला कसलाच प्रतिसाद देत नाही त्यामुळे घरच्यांना शंका येते. एक-दोनदा ते आवाज देतात तरीही आतून काही आवाज येत नाही म्हणून ते शेजारच्यांना बोलावून घेतात. दरवाजा तोडतात पण आतमध्ये पाहिलं तर ती महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसते. घरचे तिला लगोलग रूग्णालयात नेतात डॉक्टर तिची तपासणी करतात आणि मृत म्हणून घोषित करतात.
महिलेचं नाव रूचा असं होतं. बाथरूममधील पाणी गरम करण्याचा गिझर लीक झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं. गॅसच्या लिक होण्यामुळे रूचाला पुरेसा श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून तिचा मृत्यू झाला. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रूचा ही तीन महिन्याची गर्भवती होती. ही घटना फरीदाबादमधील आहे.