वडिलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

मुलगी आणि वडील यांचं एक नातं वेगळं असतं. वडिलांसाठी मुलगी परीसारखी असते. तर मुलगीही आपल्या वडिलांकडे एक सुपरहिरो म्हणून पाहते. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी दोघांच्या प्रेमात कमतरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बाप-लेकीचं नातं दृढ होतं. व्हायरल व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या डोळे हाताने झाकून उभी असल्याचं दिसतं.

Updated: Oct 16, 2022, 06:02 PM IST
वडिलांना नोकरी मिळाल्यानंतर मुलीनं दिली अशी रिअ‍ॅक्शन, Video पाहून तुमच्या डोळ्यात येईल पाणी title=

Father Daughter Swiggy Viral Video: मुलगी आणि वडील यांचं एक नातं वेगळं असतं. वडिलांसाठी मुलगी परीसारखी असते. तर मुलगीही आपल्या वडिलांकडे एक सुपरहिरो म्हणून पाहते. आयुष्यात कितीही चढउतार आले तरी दोघांच्या प्रेमात कमतरता येत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओतून बाप-लेकीचं नातं दृढ होतं. व्हायरल व्हिडीओत एक शाळकरी मुलगी आपल्या डोळे हाताने झाकून उभी असल्याचं दिसतं. तिला सरप्राईज देण्यासाठी वडील असं करतात. त्यानंतर वडील हातात स्विगीचं टी-शर्ट घेऊन उभे राहतात. डोळे उघडताच वडिलांना स्विगीमध्ये नोकरी लागल्याचं तिला कळतं आणि तिला आनंद होतो.

वडिलांना स्विगी टी-शर्टसह पाहून ती आनंदाने उड्या मारते. हा व्हिडीओ पाहून तुम्ही मुलीच्या आनंदाची कल्पना करू शकता. आनंदाच्या भरात वडिलांना मिठी मारते. आपल्या मुलीचा आनंद  पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. हा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. pooja.avantika.1987 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं असून प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका युजर्सने लिहिलं आहे, 'हा व्हिडीओ पाहून खरंच मन भरून आलं. हा व्हिडीओ पाहून वाटतं उदरनिर्वाह चालवण्यासाठी खरंच नोकरीची गरज होती.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'बाप-लेकीचं नातंच वेगळं असतं.'