Diwali 2022 : दिवाळीत बोनस देण्याची प्रथा कशी सुरु झाली?जाणून घ्या

दिवाळीत बोनस का दिला जातो? कधी सूरू झाली बोनस देण्याची प्रथा? तुम्हाला माहितीय का? 

Updated: Oct 16, 2022, 06:02 PM IST
Diwali 2022 : दिवाळीत बोनस देण्याची प्रथा कशी सुरु झाली?जाणून घ्या  title=

मुंबई : दिवाळी (Diwali) अवघ्या आठवड्यांवर ठेपलीय. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक घराची साफसफाई व शॉपिंग करण्याच्या मागे लागला आहे. त्यात कर्मचारी वर्गाला मात्र दिवाळी बोनसची (Diwali Bonus)  प्रतिक्षा लागली आहे. हा दिवाळी बोनस कधी एकदा हातात येतोय, असं झालं आहे. दरवर्षी हा बोनस कामगारांना (Diwali Bonus employee) मिळत असतो. मात्र तुम्हाला माहितीय का या दिवाळी बोनसची प्रथा कशी सुरू झाली ? आणि त्याचा इतिहास काय आहे? हे जाणून घेऊयात. 

येत्या 23 ऑक्टोबरला दिवाळीला (Diwali) सुरूवात होणार आहे. या दिवाळीपुर्वी बाजारपेठा लाईटींग, पणत्या आणि फटाक्यांच्या स्टॉल्सने सजल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक देखील दिवाळीच्या शॉपिंगमध्ये (Diwali Shopping)  गुंतला आहे. वातारणातही थोडासा थंडावा आला असून प्रसन्न वातावरण झालंय. एकूणच काय तर कधी एकदा दिवाळीचा पहिला दिवस उजाडतोय असं सर्वांना झालंय. 

दिवाळीत चिमुकल्यांना सुट्यांच आकर्षण असत. तर सरकारी पासून खाजगी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसच आकर्षण असतं. त्यात आता सरकारी कर्मचाऱ्यांचे (Government Employee) बोनस तर जाहीर झाले आहेत, मात्र खाजगी कर्मचाऱ्यांच्या (Private Employee) हातात अजून बोनस यायचा बाकी आहे, त्यामुळे त्यांना आता बोनसची उत्सुकता लागली आहे. 

दिवाळी बोनस कसा सुरु झाला?

भारतात पूर्वीच्या काळी राबणाऱ्या कामगाराला त्याच्या कामाचा मोबदला म्हणून दर आठवड्याला पगार दिला जात असे. मात्र इंग्रजांच्या राजवटीखाली भारतात आठवड्याच्या पगाराच्या हिशोबानुसार 52 आठवड्यांचा पगार मिळत होता. एक महिन्यात 4 आठवडे असतात. या नियमानुसार वर्षभराच्या पगाराच्या आखणी केली तर तो 13 महिन्यांचा पगार असायला हवा. मात्र इग्रजांच्या पगार धोऱणानुसार 12  महिन्यांचा पगार मिळते असे. 

कामगारांना जेव्हा पगाराचं गणित समजलं तेव्हा महाराष्ट्रात कामगार आक्रमक झाले. महाराष्ट्रातीसल कामगारांनी 13 महिन्यांचा पगार मिळावा अशी मागणी करत आंदोलन केले होते. कामगारांनी केलेल्या आंदोलनाची दखल इंग्रज सरकारने घेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 

हा पगार कसा द्यायचा हे ठरवताना दिवाळी (Diwali)  हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण असल्याने या सणाच्या आधी एक पगार द्यायचे इंग्रज सरकारचे ठरवले. तो पगार म्हणजे (Diwali Bonus)  बोनस. 30 जून 1940 साली ही पगार देण्याची पद्धत सुरू झाली, आणि त्याचा कायदा लागू देखील करण्यात आला होता.