अज्ञाताकडून 'डान्सिंग अंकल'च्या मेव्हण्यावर गोळीबार

ज्या मेव्हण्याच्या लग्नात डान्स करत 'डब्बू अंकल' फेमस झाले त्याच मेव्हण्यावर गोळीबार

Updated: Jul 17, 2018, 01:22 PM IST
अज्ञाताकडून 'डान्सिंग अंकल'च्या मेव्हण्यावर गोळीबार  title=

मुंबई : अभिनेता गोविंदाची स्टाईल कॉपी करतद सोशल मीडियावरून एका रात्रीच घराघरात पोहचणाऱ्या डब्बू अंकलच्या मेव्हण्यावर गोळीबार झालाय. उल्लेखनीय म्हणजे, याच मेव्हण्याच्या लग्नात 'मैं से मीना से न साकी से' गाण्यावर डान्स केल्यानंतर डब्बू अंकल फेमस झाले होते. त्यांचा हा डान्स सोशल मीडियावर भलताच वायरल झाला होता. 

मध्यप्रदेशच्या विदिशाचे रहिवासी असणारे डब्बू अंकल उर्फ संजीव श्रीवास्तव गेल्या काही महिन्यांमध्ये 'डान्सर अंकल' म्हणून ओळखले जाऊ लागले होते. अनेक कार्यक्रमांतही ते सहभागी झाले होते... श्रीवास्तव यांच्या मेव्हण्याचं नाव कुशाग्र श्रीवास्तव असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुशाग्रवर एका अज्ञातांनं गोळीबार केला... यावेळी त्याचा चेहरा झाकलेला होता. या घटनेची माहिती समजताच शेजारी कुशाग्रच्या घरी पोहचले... कुशाग्रला जखमी अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याची अवस्था गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. 

एक चोर कुशाग्रच्या घरात शिरला होता... परंतु, तो घरात दाखल होताच कुशाग्रनं त्याला पाहिलं आणि त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत चोरानं कुशाग्रवर गोळीबार केला. पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.