नवी दिल्ली : पनामा पेपर्स लीक प्रकरणात आणखी एक खुलासा झाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर 2 वर्षांनी अर्थ मंत्रालयाने म्हटलं की, पनामाच्या लॉ फर्म मोसैक फोनसेकाच्या माध्यमातून कंपनी बनवणाऱ्या भारतीयांची 1,140 कोटी रुपयांची अघोषित संपत्तीची माहिती मिळाली आहे. मोसैक फोनसेका आता बंद झाली आहे. सरकारने हे देखील सांगितलं की, या प्रकरणात 16 भारतीय वेगवेगळ्या शहरांमध्ये न्यायालयीन कारवाईचा सामना करत आहे. मोसैक फोनसेकाचा कागदपत्र लीक झाल्यानंतरच पनामा पेपर्स प्रकरण समोर आलं होतं.
आता या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर चौकशीच्या स्थितीची माहिती समोर आली आहे. विदेशी संस्थांनी भारतीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हे नोंदवण्यात आले. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्ट नुसार पनामा पेपर लीक प्रकरणात पहिली याचिका 9 डिसेंबर 2016 ला कोलकाताच्या न्यायालयात दाखल करण्यात आला. याशिवाय अहमदाबाद, बंगळुरु आणि मुंबईमध्ये देखील गुन्हे नोंदवण्यात आले.
या प्रकरणात आयकर कायद्यानुसार कलम 277 नुसार चुकीची माहिती देणे आणि कलम 276 टॅक्सपासून वाचण्यासाठी संपत्ती ट्रान्सफर करणे याखाली गुन्हा दाखल केला गेला आहे. दोन्ही कलममध्ये जास्तीत जास्त 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते. पनामा पेपर्स लीक प्रकरणात ज्या भारतीयांवर कारवाई सुरु आहे त्यांच्यामध्ये बलराम लोढा, भारमल लोढा, राजेंद्र पाटील, अनुराग केजरीवाल आणि धवल पटेल यांचा समावेश आहे.
पनामा पेपर्स नावाचे कागदपत्र जगासमोर आणण्याचं काम अमेरिकेतील शोध पत्रकारीतेतील संस्था आंतरराष्ट्रीय महासंघ (ICIJ) केलं आहे. आयसीआयजेने या कागदपत्रांची व्यवस्थिती माहिती घेतली. आयसीआयजेला एका अज्ञात व्यक्तीने हे पेपर दिले होते. य़ा प्रकरणात अनेक सिनेकलाकार, खेळाडू यांच्यासह 140 लोकांच्या संपत्तीचा खुलासा झाला. भारतातील काही व्यक्तींची नावे देखील पेपरमध्ये आहेत.
चौकशीत असं समोर आलं की, 1977 पासून 2015 पर्यंतची माहिती या कागदपत्रांमध्ये आहे. जर्मनीतील एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार 2.6 टेराबाईट डेटा समोर आला. या लोकांनी टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये पैसा गुंतवला होता. अनेक कंपन्या, संस्था बनवल्या आणि त्यामध्ये पैसा गुंतवला.