देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने तोडले जागतिक रेकॉर्ड

 देशात कोरोनाचं थैमान प्रचंड वाढलं आहे. कोरोनाचा विषाणू सर्व रेकॉर्ड तोडत आहे.

Updated: May 1, 2021, 10:12 AM IST
देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने तोडले जागतिक रेकॉर्ड title=
representative image

नवी दिल्ली : देशात कोरोनाचं थैमान प्रचंड वाढलं आहे. कोरोनाचा विषाणू सर्व रेकॉर्ड तोडत आहे. शुक्रवारी पहिल्यांदा देशात 4 लाखाहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली.  तर साधारण साडेतीन हजार रुग्णांचा मृत्यू झाला. एप्रिलमध्ये कोरोनाची संसर्गाची गती तीव्र वाढली आहे. या दरम्यान जवळपास 7 लाख नवीन रुग्णांना संसर्ग झाला आहे. फक्त संसर्गच नाही तर एप्रिलमध्ये कोरोना मृत्यूंचा आकडा भयावह आहे.

देशात शुक्रवारी 4 लाख 2 हजार नवीन रुग्णांची नोद झाली आहे. 24 तासात सर्वाधिक वाढ नोंदवणारी ही जगातील सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. मागील 10 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाखावरून 4 लाखांपर्यंत पोहचला आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोनाच्या गती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

PTR दर सर्वांत चिंताजनक

देशातील एकूण चाचण्यांपैकी संसर्ग असण्याचे प्रमाण वाढले आहे. देशात एकूण चाचण्यांपैकी 21.6 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाच्या तीव्र गतीमुळे PTR वाढल्याचे दिसून येत आहे.

देशात महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. महाराष्ट्रात दररोज 65 हजाराहून अधिक रूग्णांचे निदान होत आहे तर, दिल्लीतही दररोज 25 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद आहे.