Cyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट

Mandous Cyclone चा धोका वाढला, बहुतांश भागात ढगाळ वातावरण आणि तापमानात वाढ कायम राहण्यची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Updated: Dec 9, 2022, 10:06 PM IST
Cyclone Mandous : हिवाळ्यात पावसाळा ! महाराष्ट्रातल्या 'या' भागात अवकाळी पावसाचं संकट title=

Cyclone Mandous: बंगालच्या उपसागरातील (Bay of Bengal) कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर झाल्याने राज्यात 15 डिसेंबरपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय. मंदोस चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना (South States) जास्त बसण्याची शक्यता आहे. त्यासोबत महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातमध्येही (Gujrat) पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (Department of Meteorology) देण्यात आलाय. कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्याचप्रमाणे बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे. 

मंदोस चक्रीवादळाचा धोका
तामिळनाडू (Tamilnadu), पद्दूचेरी (Puducherry) आणि आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) या राज्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिल आहे. मंदोस चक्रीवादळामुळे (Cyclone Mandous) या तिनही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मंदोस चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांनाही बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुंबई, कोकण, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज आहे. 

अस्मानी संकाटामुळे प्रशासन सज्ज
मंदोस चक्रीवादळ तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्यावर धडकल्याने तामिळनाडूमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कोडाईकनाल परिसरात अनेक भागात मोठमोठी झाडं उन्मळून पडली. चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालं आहे. NDRF आणि SDRF ची पथकं तैनात करण्यात आली आहेत. एकूण 12 पथकं तयार करण्यात आली असून यात 400 जवानांचा समावेश आहे. याशिवाय बोटी, हाय व्होल्टेज मोटर, कटर मशीन याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

वाऱ्याचा वेग 65 ते 85 किमी प्रतिसात रहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यात वारा आणि पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून तामिळनाडूतील काही शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.