पुलवामामध्ये सीआरपीएफ तळावर आत्मघातकी हल्ला, एक जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथील सीआरपीएफ ट्रेनिंग तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 31, 2017, 09:05 AM IST
पुलवामामध्ये सीआरपीएफ तळावर आत्मघातकी हल्ला, एक जवान शहीद title=

पुलवामा : जम्मू काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा येथील सीआरपीएफ ट्रेनिंग तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. सीआरपीएच्या 185 बटालियनच्या हद्दीत घुसून हा हल्ला करण्यात आला.रात्री दोनच्या सुमारात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असून हा हल्ला जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याचं बोललं जातंय.

या आत्मघातकी हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झालेत. जखमी जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अजूनही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू असून संपूर्ण परिसराची जवानांनी घेराबंदी केलीय. दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यासाठी जवानांनी कंबर कसलीय.

या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. तर पुलवामाजवळील नॅशनल हायवे बंद करण्यात आलाय. दरम्यान या हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी पोलीस आणि सैन्य दलाला सर्तकतेचा इशारा दिला होता.