Video : प्रशासनाने बनवला 1 कोटींचा यू-टर्न; लोक म्हणतातय, सोन्याचा आहे का?

आधी दीड कोटींचा तर आता एक कोटींचा यू - टर्न बनवल्याने त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. एका युजरने तर मुख्यमंत्र्यांनाच टॅग करुन या कामासाठी एक कोटी रुपये खर्च करावे लागल्याची आठवण करुन दिली आहे

Updated: Apr 2, 2023, 05:39 PM IST
Video : प्रशासनाने बनवला 1 कोटींचा यू-टर्न; लोक म्हणतातय, सोन्याचा आहे का? title=
(फोटो सौजन्य - Twitter)

Viral Video : सरकारी कामांवरुन नागरिकांमध्ये पायाभूत सुविधांच्या कामांबाबत कायमच प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळते. रस्त्यांवर वारंवार खोदण्यात येणार खड्डे, कामांना लागणारा अतिरिक्त वेळ, त्यामुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशातच जर निकृष्ट दर्जाचे काम झाले असेल तर लोकांना संताप अनावर होतो. कारण नागरिकांच्या कररुपी आलेल्या पैशातून या सर्व पायाभूत सुविधांची कामे होत असतात. अशातच नोएडामध्ये झालेल्या एका कामामुळे प्रशासनावर जोरदार टाकी केली जात आहे. सोशल मीडियावर या कामावरुन प्रशासनाला धारेवर धरण्यात आले आहे..

नोएडा प्राधिकरणाच्या (NOIDA Authority) व्यवस्थापकीय संचालक (CEO) रितू माहेश्वरी यांनी 1 एप्रिल रोजी सकाळी एक ट्विट केले आणि या सर्व वादाला सुरुवात झाला. रितू माहेश्वर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता. नोएडा सेक्टर 67-70 च्या रस्त्यावर एक नवीन यू-टर्न बनवण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांना कमी थांबा घ्यावा लागणार असून वाहतूक कोंडीही कमी होणार आहे. त्यामुळे नोएडावासीयांचा वेळ वाचणार आहे, असे या ट्विटमध्ये म्हटलं होते.

पण या ट्विटमध्ये या कामाच्या खर्चाची किंमतही दिली होती जी वाचून सगळ्यांच धक्का बसला आहे. हा यू-टर्न बनवण्यासाठी 99.71 लाख रुपये खर्च झाले आहेत, असे रितू माहेश्वरी यांनी म्हटलं आहे. हे ट्विट समोर येताच ट्विटरवर लोकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही हे काय बनवले आहे? तुम्ही त्याचे कॉस्ट ऑडिट देऊ शकाल का? असा सवाल एका युजरने केला आहे.

दुसऱ्या एका युजरने देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतकाळ सुरु असल्याचे म्हणत इतक्या स्वस्तात कसे काम झाले, असे म्हटलं आहे.

एका युजरने तर थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या प्रकरणात खेचले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी नोएडा प्राधिकरणाने यू-टर्न तयार करण्यासाठी एक कोटी रुपये खर्च केले आहेत हे लक्षात घ्या, असा टोला लगावला आहे. तर आणखी एका युजरने 99.71 लाखांचा यू-टर्न? यू-टर्नमध्ये सोने वापरले जाते की भ्रष्टाचार? असा सवाल केला आहे.

 

दरम्यान, याआधीही नोएडा प्राधिकरणाने याआधीही यापेक्षा अधिक महाग यू-टर्न तयार केले आहेत. नवसंजीवनी नोएडाच्या मायानगरीतही असाच प्रकार घडला होता.

ग्रेटर नोएडा औद्योगिक विकास प्राधिकरणाने 3 फेब्रुवारी रोजी ट्विट करत सूरजपूर-कसना रस्त्यावर यू-टर्न बनवण्यात आला आहे. या यू-टर्नच्या बांधकामामुळे सुरळीत वाहतूक सुरळीत झाली आहे. या प्रकल्पासाठी दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे नोएडा प्राधिकरणाने म्हटलं होतं.