अनिल कपूरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'पुढच्या जन्मात भेटू'

पाच वर्षांपासून सुरु असलेला जमिनीच्या वाद आणि छळाला कंटाळून तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनं खळबळ उडाली असून तरुणाच्या कुटुंबियांनी आरोपींविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

Updated: Mar 3, 2023, 01:43 PM IST
अनिल कपूरच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'पुढच्या जन्मात भेटू' title=

Crime News : जमिनीच्या वादातून एका तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने लिहिलेली चिठ्ठी (Suicide Note) पोलिसांना सापडली आहे. यात तरुणाने काही लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होतं. तसंच कुटुंबियांची माफी मागत त्याने पुढच्या जन्मात भेटण्याचं वचन दिलं. तरुणाच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

काय आहे नेमकी घटना?
उत्तरप्रदेशमधल्या (Uttar Pradesh) प्रतापगड इथली ही घटना आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव मोहित उर्फ सचिन असं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठित मोहितेने पाच वर्षांपासून सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतापगडमध्ये राहाणारे शशी कपूर, अनिल कपूर आणि शैलेंद्र कपूर यांच्या त्रासाला कंटाळून मोहितने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

हा तरुण प्रतागडमधल्या देवसरा गावात राहातो. तरुणाच्या शेजारीच राहाणाऱ्या शशि कपूर उपाध्याय, अनिल कपूर उपाध्याय आणि शैलेंद्र उपाध्याय या भावंडांबरोबर त्याचा जमिनीचा वाद सुरु होता. या तीन भावंडांनी मोहितचं जगणं मुश्लिक केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. कोर्ट कचेरी आणि उपाध्या बंधूंच्या त्रासाला मोहित कंटाळला होता. त्यामुळे अखेर त्याने टोकाचं पाऊल उचललं.  याप्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी उपाध्याय बंधूंविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

20 दिवस पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह
दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी तरुणाच्या आत्महत्येची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. पत्नी घर सोडून गेल्याने नैराश्यातून कानपूरमध्ये (Kanpur) राहाणाऱ्या एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे त्याने आत्महत्या केल्याची कोणालाच खबर नव्हती. जवळपास 20 ते 25 दिवस त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. पत्नी घरी आल्यानंतर तीने पतीचा मृतदेह पाहिला आणि ती बेशुद्ध पडली.

कानपूरच्या अमीनाबाद गावात राहाणारा सुदाम शर्मा हा पत्नी आणि मुलांसहित राहात होता. एक महिन्यापूर्वी काही कारणाने त्याचं पत्नीबरोबर भांडण झालं. या रागातून पत्नी मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. यादरम्यान तिच्या बहिणीची तब्येत बिघडल्याने काही दिवस ती माहेरीच थांबली. 20-25 दिवसांनी ती पतीच्या घरी परतली. पण दरवाजा उघडताच तिला धक्का बसला. पतीचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होता. समोर दृश्य पाहून ती आरडा-ओरडा केला आणि तिथेच बेशुद्ध पडली. आरडा-ओरडा ऐकून शेजारची लोकं धावत आली. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.