Crime news : कर्नाटकातील (Karnataka) मडिकेरीमध्ये एक धक्कादायक आणि विकृत प्रकरण उघडकीस आलंय. रुग्णालयातील (Hospital) शिपायाचं घृणास्पद कृत्य सध्या खूप चर्चेत आलंय. हा आरोपी मडिकेरी शहरातील रुग्णालयामध्ये काम करायचा. पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, मडिकेरी जिल्हा रुग्णालयात शिपाई म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने शवागारात महिलांच्या मृतदेहांची नग्न फोटो क्लिक केले होते. सय्यद असं या व्यक्तीचं नाव आहे. ही गोष्ट समोर आल्यापासून आरोपी मात्र फरार आहे. दरम्यान पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरूये.
हा आरोपी सय्यद हा कोविड वॉरियर म्हणून त्यावेळी रुग्णालयात दाखल झाला होता. कोरोनाच्या काळामध्ये आरोपीने जवळपास 300 मृतदेह शवागृहात ठेवले होते. त्याचे आता घृणास्पद वास्तव आता समोर आलंय.
शवागृहातील फोटो काढण्याच्या मुद्द्याविरोधात एका हिंदू संघटनेने याप्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. दरम्यान तक्रार दाखल झाल्यानंतर सय्यद फरार झाला. यावेळी या आरोपीने रूग्णालयांच्या अधिकाऱ्याकडे राजीनामाही दिला आहे.
मिळालेल्या रिपोर्ट्समध्ये असंही नमूद करण्यात आलंय की, आरोपीने रूग्णालयाच्या शवगृहात लैंगिक संबंध बनवले होते. हिंदू जागरण समितीने रुग्णालयाचे डीन डॉ. करिअप्पा यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केली.
शवागृहाचे अटेंडेंट सय्यद हुसैन याने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना शवागृहात बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. इतकंच नाही तर शवागृहाच येणाऱ्या महिलांच्या विवस्त्र मृतदेहांचे फोटो काढल्याचा आरोपही सय्यदवर आहेत. ही घटना तेव्हा उघडकीस आली, जेव्हा आरोपीच्या फोनमध्ये अनेक मृत महिलांचे न्यूड फोटो सापडले.
हा व्यक्ती रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांना शवागृहात लैंगिक संबंध ठेवण्यासाठी बोलवण्याचे कॉल रेकॉर्डही मोबाईलमध्ये मिळालेत, असं अहवालात नमूद करण्यात आलंय. या व्यक्तीचे शवागारातील अनेक महिलांशी संबंध असल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय.
याशिवाय आरोपी सय्यदने यापूर्वी एकदा महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला होता. स्थानिक लोकांनी आरोपीला पकडलं आणि त्याचा मोबाईल काढून घेतला. ज्यानंतर सय्यदचं हे घृणास्पद कृत्य सर्वांच्या समोर आलं.