मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्...

Ajmer Crime News: पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली. नेमकं काय घडलं पाहूया...

Updated: Jul 27, 2023, 10:13 AM IST
मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील Video बनवला, ब्लॅकमेल करून OYO वर नेलं अन्... title=
nude video Crime News

Ajmer Girl Viral Video While Taking Bath:  पैशासाठी आणि हवस भागवण्यासाठी माणूस कोणत्या थरावर जाईल काही सांगता येत नाही. कानावर विश्वास बसणार नाही अशा दररोज वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत असतात. अशातच एक धक्कादायक बातमी (Crime News) समोर आली आहे. अजमेर जिल्ह्यातील तरुणीसोबत दुष्कर्म केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क मित्रानेच घात केल्याचा प्रकार समोर आल्याने आता सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपींनी तिला अर्धनग्न फोटो काढले आणि ब्लॅकमेल करून 72 हजार रुपये उकळल्याचा तसेच अश्लिल व्हिडीओ (Obscene Video Of Girl) व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि हादरवून टाकणारी माहिती समोर आली. नेमकं काय घडलं पाहूया...

आरोपी आणि पिडीत तरुणी यांची 8 महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. हळुहळू ओळख वाढली. मैत्री झाल्यानंतर आरोपी तरुण घरात आला अन् सामन्य पद्धतीने वावरू लागला. एक दिवस अचानक तरुणी अंघोळ करत असताना त्याने तिचे अर्धनग्न फोटो काढले. त्यानंतर अर्धनग्न फोटोंच्या माध्यमातून आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तब्बल 4 महिने चालला आणि 4 महिन्यांपासून पीडितेकडून सुमारे 72 हजार रुपये उकळले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही.

आणखी वाचा - Crime News: 19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!

ब्लॅकमेल करत आरोपीने तिला अजमेर येथील हॉटेलमध्ये नेलं आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं. या दुष्कृत्याचा व्हिडीओही आरोपींनी बनवला होता, नंतर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून तिला धमक्या देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर तुला माझा गांजाच्या व्यवसाय आहे, तुला त्यात अडकवेल, अशी धमकी आरोपी देऊ लागला. त्यानंतर त्याने पीडितेला धमकावून एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तरुणीने धाडस केलं अन् आरोपीचा खेळ खल्लास झाला.

पिडीत तरुणीने थेट पोलिसात धाव घेतली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दुष्कर्मासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला अन् आरोपीला खाक्या दाखवल्या. त्यानंतर आता पोलीस या प्रकरणात आणखी तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.