Highcourt Verdict : चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात शिक्षा सुनावताना न्यायाधिशांनी केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कमी करुन 20 वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताना अत्याचारानंतर मुलीला जिंवत सोडलं, आरोपी खूप दयाळू आहे अशी टिपणी केली.
उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुबोध अभ्यंकर आणि न्यायाधिश एस के सिंह यांनी शिक्षा कमी करताना म्हटलंय, दोषीने चार वर्षांच्या मुलीसोबत हे कृत्य केलं ते स्त्रीच्या प्रतिष्ठेच्या आणि सन्मानाच्या विरोधात आहे. न्यायालय 4 वर्षांच्या मुलीसोबत आरोपीन केलेल्या कृत्यांना पाठिशी घालणार नाही.
निकालात पुढे म्हटलंय, आरोपीने अत्याचाराच्या कृत्यानंतर मुलीला जिंवत सोडलं, हा त्याचा दयाळूपणा होता, त्यामुळे त्याच्या जन्मठेपेची शिक्षा सश्रम कारावसात बदलली जावी असं न्यायालयाने म्हटलं आहे. अखेर या या आरोपीची जन्मठेपेची शिक्ष रद्द करुन त्याला 20 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
आरोपी 15 वर्षांपासून तुरुंगात
अत्याचारातील आरोपी राम सिंह हा गेल्या 15 वर्षांपासून तुरुंगात आहे. आरोपी राम सिंह हा झाबुआ इथं रहाणारा आहे. इंदौरमध्ये तो मजूरी करण्यासाठी आला होता. तो रहात असलेल्या परिसरात एका झोपडीत त्याने चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. घटनास्थळी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात आढळली होती. मुलीच्या आजीने आरोपीला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं होतं.