Crime News: लग्नाच्या आधी मुलगी बेपत्ता; मृतदेह पाहिल्यानंतर सगळा परिसर करु लागला उलट्या; पोलीसही हादरले

Crime News: गुजरातच्या (Gujrat) पाटणमधील (Patan) सिद्धपूर येथील 25 वर्षांच्या लवीनाचं लग्न होणार होतं. पण लग्नाच्या पाच दिवस आधीच लवीन अचानक गायब होते. एका सीसीटीव्हीत ती शेवटची कैद झाली होती. पण जेव्हा तिचा मृतदेह सापडतो तेव्हा सगळा परिसर उलट्या करु लागतो.   

शिवराज यादव | Updated: May 25, 2023, 12:57 PM IST
Crime News: लग्नाच्या आधी मुलगी बेपत्ता; मृतदेह पाहिल्यानंतर सगळा परिसर करु लागला उलट्या; पोलीसही हादरले title=

Crime News: गुजरातच्या (Gujrat) पाटणमधील (Patan) सिद्धपूर येथील 25 वर्षांच्या लवीनाचं लग्न होणार होतं. पण लग्नाच्या पाच दिवस आधीच लवीन अचानक गायब झाली होती. एका सीसीटीव्हीत ती शेवटची कैद झाली होती. प्रयत्न करुनही तिचा शोध लागत नाही. पण यादरम्यान परिसरातील लोकांच्या घरातील नळातून घाणेरडं आणि दुर्गेंधी पाणी येण्यास सुरुवात होती. चार दिवस लोक हे पाणी पितात. पण चार दिवसांनी जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा सर्व परिसर उलट्या करु लागतो. 

पाटण जिल्ह्यात सिद्धपूर नावाचा एक परिसर आहे. जवळपास सव्वा लाख या परिसरात राहतात. साड्यांसाठी पाटण हे प्रसिद्ध असून येथे 5 लाखांपासून किंमती सुरु होता. याच पाटणमधून 25 वर्षांची लवीना हरवानी वास्तव्याला होती. 12 मे रोजी लवीनाचं लग्न होणार होतं. पण लग्नाच्या पाच दिवस आधी 7 मे रोजी ती अचानक गायब होते. ज्या सीसीटीव्हीत ती शेवटची दिसली होती तो रस्ता पाण्याच्या टाकीकडे जातो. याच टाकीतून संपूर्ण परिसराला पाण्याचा पुरवठा होतो. 

लवीनाच्या कुटुंबाने 8 मे रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पण लवीनाचा काही शोध लागत नाही. यादरम्यान 12 मे रोजी परिसरातील लोकांना घरात येणारं पाणी घाणेरडं आणि दुर्गेंधी असल्याचं लक्षात येतं. पाण्याचा पुरवठाच असाच होत असल्याने असं पाणी येत असावं असं रहिवाशांना वाटतं. त्यामुळे पर्याय नसल्याने ते हेच पाणी पिण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी वापरतात. ही समस्या नंतरही सुरु असल्याने काही लोकांनी पालिकेकडे तक्रार केली. पालिकेने त्यांना आम्ही पाहू असं आश्वासन देत परत पाठवलं होतं. पण पाण्याची ही समस्या काही मिटली नाही. 

यादरम्यान हे पाणी पित असल्याने काही लोकांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. काही लोक आजारी पडले होते. यामुळे लोकांनी बाजारातून पाण्याची बाटली विकत आणून तहान भागवण्यास सुरुवात केली. 12 ते 15 मे पर्यंत हे सगळं सुरु होतं. 

16 मे रोजी अचानक पाणी येणं बंद झालं. जवळपास 4 हजार घरांचा पाणीपुरवठा बंद झाला. यानंतर मात्र पालिका खडबडून जागी झाली. पालिकेने पाईपलाइन तपासली असता एक धक्कादायक सत्य समोर येतं. हे सत्य ऐकल्यानंतर सगळा परिसर अक्षरश: उलट्या करु लागतो. कारण पाइपलाइनमध्ये लवीनाचा मृतदेह होता. गेल्या 9 दिवसांपासून सर्व लोक मृतदेह तरंगत असलेल्या पाइपलाइनमधून येणारे पाणी पित होते. 

पालिका कर्मचाऱ्यांना पाइपलाइनमध्ये एखाद्या जनावराचा मृतदेह अडकला आहे असं वाटलं. पण जेव्हा त्यांनी मृचदेह बाहेर काढला तेव्हा सगळेच हादरले. हा एका माणसाचा अर्धवट मृतदेह होता. मृतदेहाचं शीर आणि पाय गायब होते. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. मृतदेहाचा उर्वरित भाग पाइपलाइनमध्ये आहे का हे तपासण्यासाठी रोबोटिक कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली. पण हा प्रयोग अयशस्वी ठरला. नंतर पाण्याची टाकी पूर्णपणे भरत एकाच वेळी पाणी सोडण्यात आलं. यामुळे पाइपलाइनमध्ये अडकलेले दोन पाय बाहेर पडले. 

यानंतर पोलिसांकडे हा मृतदेह लवीनाचाच आहे का याचा शोध घेण्याचं आव्हान होतं. तिचा दुपट्टा आणि बांगडी घटनास्थळी सापडली होती. पण त्यावरुन लवीनाची हत्या झाल्याचं निष्पन्न होत नव्हतं. पण अखेर डीएनएच्या माध्यमातून हा मृतदेह लवीनाचाच असल्याचं स्पष्ट झालं. 

लवीनाचा मृतदेह ज्या टाकीत सापडला ती 60 फूट उंच आहे. त्यामुळे जर कोणी तिची हत्या केली असेल तर आरोपी इतक्या वरती कशासाठी जाईल असा प्रश्न उपस्थित होते. रात्रीच्या अंधारात वरती जाणं, पाण्याच्या टाकीत मृतदेह टाकणं हे पोलिसांच्या पचनी पडत नाही आहे. हे काम एका व्यक्तीचं नसावं अशी पोलिसांना शंका आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.