मुंबई : आजकाल क्रेडिट कार्डने शॉपिंग करताना अनेकदा बजेटचा विचार केला जात नाही. मात्र जेव्हा क्रेडिट कार्डचे पैसे भरायचे असतात तेव्हा खरी पंचायत होते. अनेकदा या छोट्या छोट्या गोष्टी तुमचा खिसा रिकामा करून बँकेला मालामाल करतात. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
बदलत्या लाईफस्टाइलमुळे क्रेडिट कार्डचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. आज अनेक नोकरदार वर्गाकडे किंवा तरूणाईकडे अनेक क्रेडिट कार्ड मिळणं अधिक सोपं आहे. क्रेडिट कार्ड मिळणं सोपं आहे पण जर त्याचा वापर स्मार्ट पद्धतीने केला नाही तर हे क्रेडिट कार्ड तुम्हाला नुकसान करू शकतं. क्रेडिट कार्डचं पेमेंट करताना अखेरची तारीख लक्षात ठेवावी.
क्रेडिट कार्डमधून शॉपिंग करताना अनेकदा बजेटचा विचार करा. अनेकदा लोकं बजेटपेक्षा शॉपिंग जास्त करतात आणि अखेरच्या तारखेला ते भरणं अतिशय कठिण होतं. आणि आपल्या अशाच छोट्या छोट्या चुका बँकेला मालामाल करतात.
कायम क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांना शेवटची तारीख आठवत नाही ही सर्वात मोठी चूक असते. तुम्ही पूर्ण महिन्यात क्रेडिट कार्डचा वापर करा पण शेवटच्या दिवसाला त्याचं पेमेंट करणं विसरू नका. कायम शेवटच्या तारखे अगोदर पेमेंट करा. असं केल्यामुळे आपलं सिबिल चांगल राहिलं. जर तुम्ही आऊट स्टँडिंग पेमेंट केलं नाही तर तुम्हाला पेनल्टी लागण्याची शक्यता असते. आणि यामुळे तुमचं सिबिल खराब होऊ शकतं.
तुमच्या क्रेडिट कार्डचं बिल प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला जनरेट होतं. बिलमध्ये अंतिम तारिख आणि मिनिमम बॅलेंसचा उल्लेख केला आहे. काही ग्राहक मिनिमम बॅलेंसच पेमेंट देखील करत नाहीत. त्यानंतर बँकेकडून पेनाल्टी लावण्यात येते. यानंतर बँकेकडून लावण्यात येणाऱ्या पेनल्टीमुळे तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. काही ग्राहकांच असा प्रयत्न असतो की, मिनिमम बँलेस देखील अवश्य भरणे पण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. मिनिमम बँलेस भरल्यानंतरर बँकेकडून बाकी रक्कमेवर व्याज जोडलं जातं आणि वसूल केलं जातं. त्यामुळे संपूर्ण पैसे भरणे आवश्यक आहे.