Credit Card Tips | एकाहून अधिक क्रेडिट कार्डचा वापर करणार असाल तर, या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

जर तुम्ही आधीपासून एकाहून अधिक क्रेडिट कार्डचा वापर करीत असाल. आपल्या सर्व क्रेडिट कार्डचे बिल्स योग्य वेळी भरायला हवे. यामुळे आपला क्रेडिट स्कोअर चांगला राहतो

Updated: Aug 9, 2021, 07:53 AM IST
Credit Card Tips | एकाहून अधिक क्रेडिट कार्डचा वापर करणार असाल तर, या गोष्टी नक्की लक्षात ठेवा title=

मुंबई : जर तुम्ही आधीपासून एकाहून अधिक क्रेडिट कार्डचा वापर करीत असाल. आपल्या सर्व क्रेडिट कार्डचे बिल्स योग्य वेळी भरायला हवे. यामुळे आपला क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. अशा स्थितीत तुम्हाला इतर बँकांकडून नवीन क्रेडिट कार्डसाठी फोन येऊ शकतो. अशावेळी तुम्ही काय कराल? पुन्हा नवीन क्रेडिट कार्ड घेणार? एक व्यक्ती किती क्रेडिट कार्ड वापरू शकतो.? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील. या जाणून घेऊ क्रेडिट कार्डशी जोडले गेलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं...

क्रेडिट कार्ड लिमिट
जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेत असाल तर तुमची सॅलरी आणि उत्पन्नाच्या साधनांच्या हिशोबाने आपल्या क्रेडिट कार्डची लिमिट निश्चित केली जाते. जस जसे काळ पुढे सरकतो. तुमचे उत्पन्न वाढत जाते. परंतु अनेकदा उत्पन्न वाढून देखील क्रेडिट कार्डची लिमिट वाढवली जात नाही. अशा स्थितीत तुम्ही नवीन क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करू शकता.

असे म्हटले जाते की, क्रेडिट कार्ड लिमिटच्या 30 टक्के तुम्ही रेग्युलर वापर करायला हवा. त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर देखील पडतो. तुम्ही 1 लाक रुपयांच्या लिमिटचे क्रेडिट कार्ड घेतले आहे. आणि तुम्ही दर महिन्याला 70 हजार रुपये खर्च करीत आहात. म्हणजेच तुम्ही 70 टक्के वापर करीत आहात. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येईल.

नवीन क्रेडिट कार्डची ऑफर
नवीन क्रेडिट कार्डसोबत मिळणारे ऑफर तपासून घ्या. जर अशी ऑफर असेल की, ज्यामुळे तुमचा मासिक खर्चात बचत होत असेल. जसे की क्रेडिट कार्डने पेट्रोल भरल्याने कॅशबॅक मिळत असेल. तर अशा ऑफरचे क्रेडिट कार्ड घेण्यास हरकत नाही.

कोणता मोठा खर्च येणारा असेल,
जर तुम्हाला आधीपासून माहिती आहे की, पुढे काही मोठा खर्च येणार आहे. अशा स्थितीत तुम्ही संभावित खर्चासाठी तयार राहण्यासाठी नवीन क्रेडिट कार्डला अप्लाय करू शकता.

एकाहून अधिक क्रेडिट कार्ड वापराचे नुकसान

  • एकाहून अधिक क्रेडिट कार्ड असल्याने तुम्ही कर्जाच्या जाळ्यात फसण्याची शक्यता अधिक असते. 
  • एकाहून अधिक कार्डचा अर्थ एकाहून अधिक ड्यु डेट होय. जर तुम्ही ड्यु डेटपर्यंत बील भरण्यास विसरला तर तुम्हाला मोठे व्याज चुकवावे लागते. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.
  • कंपन्या अनेकवेळा वार्षिक फी किंवा अधिक व्याजदरासारखे चार्जेस लपवतात. अशात नवीन कार्ड घेताना याविषयी डिटेल माहिती जाणून घ्या
  • जर तुमच्याकडे एकाहून अधिक क्रेडिट आहे. तर अनेकदा बँक तुम्हाला मोठे कर्ज जसे की , गृह कर्ज किंवा ऑटो लोन देण्यास मनाई करतात.

(नोट ः ही माहीती एक्सिस बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या एका लेखावर आधारित आहे.)