क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग सेंटरला आग !

 एक तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. 

Updated: Apr 22, 2019, 04:32 PM IST
क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग सेंटरला आग ! title=

मुंबई: दक्षिण मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केटमध्ये सोमावारी एका शॉपिंग सेंटरला आग लागली आहे. या घटनेत कोणाला काही नुकसान पोहचले नाही. मात्र या दुकानात असलेल्या वस्तू जळून राक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या एका आधिकाऱ्यानी सांगितले की, अब्दुल रेहमान स्ट्रीट वर हे शॉपिंग सेंटर आहे. माहितीनुसार सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. थोड्या वेळातचं आगीने रौप्य रुप धारण केलं. 

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, या दुकानात कोणलाच काही नुकसान झाले नाही. मात्र या दुकानातील इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक, स्टेशनरी आणि इलेक्ट्रिक उपकरणांचा मोठा साठा होता. यामुळे आग वाढली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी ४ अग्निशमन गाडी उपस्थित झाल्या.  एक तासानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे. .  आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट झालं नाही. स्थानिक पोलिसांकडून या घटनेची कसून चौकशी केली जात आहे.