नवी दिल्ली : कडक पक्षशिस्तीसाठी ओळखल्या डाव्या पक्षांपैकी एक असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) पॉलेट ब्युरोमध्ये मतभेद झाल्याचे वृत्त आहे. हे मतभेद 2019मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढायचे की, कॉंग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करायची याबाबत आहेत.
माकपच्या पॉलेट ब्युरोची दोन दिवसांची बौठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा केली. यातील एक मुद्दा महासचिव सीताराम येच्युरी यांनी मांडला. तर, दुसरा मुद्दा माजी महासचिव प्रकाश करात यांनी मांडला. या मुद्द्यांना अनुसरून या बैठकीत पुढील तीन वर्षात पक्षाचे धोरण कसे असायला हवे याबाबत चर्चा करून सूचना देण्यात आल्या. दरम्यान, या बैठकीतीत कोणत्याही निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले नाही. बैठकीतील चर्चेचा मसूदा केंद्रीय समितीकडे सूपूर्त केला जाणार आहे. ज्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल.
प्राप्त माहितीनुसार, माकपाचे महासचिव सीताराम येच्यूरी यांचे म्हणने असे की, 2019च्या निवडणुकांमध्ये भाजप आणि जातियवादी पक्षांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत आघाडी करावी. पक्षाचे माजी महासचीव प्रकाश करात यांचीही या मुद्द्याला सहमती आहे. पण, त्यांचे म्हणने असे की, भाजप आणि जातियवादी शक्तींना पराभूत करायलाच हवे. पण, त्यासाठी कॉंग्रेस किंवा इतर कोणत्या पक्षासोबत आघाडी करण्याची गरज नाही, असा करात यांचा विचार आहे.
दरम्यान, पक्षाने दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, 'पॉलिटी ब्यूरोने 22व्या कॉंग्रेसमध्ये राजकीय धोरणांव चर्चा केली. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. 19 ते 21 जानेवारी या काळात होणाऱ्या केंद्रीय समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.'
सीताराम येच्युरी यांचा मतप्रवाह असा की, कॉंग्रेससोबत राजकीय आघाडी नाही झाली तरी, राष्ट्रीय पातळीवर एक समझोता होणे आवश्यक आहे. जसे की, स्थानिक पातळीवर जांगाबाबत ताळमेळ. पक्ष सूत्रांची माहिती अशी की, पॉलिट ब्यूरोच्या बैठकीत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. पण, पॉलेट ब्यूरो लवकरच निर्णयाप्रत येईल. अशी चर्चा आहे की, प्रकाश करात यांनी मुद्दा मांडला आहे की, सध्यास्थितीत भाजप आणि जातियवादी पक्ष हा माकपचा प्रमुख विरोधक आहे. त्यांचा पराभव करायलाच हवा. पण, म्हणून त्यासाठी कॉंग्रेससोबत राजकीय तडजोड करण्याची आवश्यकता नाही. महत्त्वाचे असे की, तामिळनाडूमधील आर के नगर विधानसभेच्या जासेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत माकपने कॉंग्रेसचा सहकारी असलेल्या द्रमुकच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.