आनंदाची बातमी : देशात आणखी ५ लसी येणार, जाणून घ्या !

 ‘स्पुतनिक व्ही‘ या लसीच्या आपत्कालीन वापराविषयी तज्ज्ञांच्या समितीची आज बैठक

Updated: Apr 12, 2021, 01:14 PM IST
आनंदाची बातमी : देशात आणखी ५ लसी येणार, जाणून घ्या ! title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : कोविड रूग्णांची वाढणारी आकडेवारी पाहता लस मोठ्या प्रमाणावर आवश्यक असणार आहे. त्यामुळे लवकरच तिसरी कोरोना लस भारतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील बर्‍याच राज्यांत कोरोना विषाणूच्या लसींच्या लसीचा साठा पाहता, ‘स्पुतनिक व्ही‘ या लसीच्या आपत्कालीन वापराविषयी तज्ज्ञांची समिती आज बैठक घेणार आहे. जानेवारी महिन्यात देशात कोरोना लसीकरण सुरू झाले आणि आतापर्यंत एकूण १० कोटी ४५ लाख २८ हजार ५५६ लोकांना लस देण्यात आली आहे.

देशात ५ लसी येणार

सध्या देशात कोविड -१९ वर दोन लसी तयार केल्या गेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे कोविशिल्ड आणि दुसरी भारत बायोटीकची कोवाक्सिन. त्याचबरोबर या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीच्या शेवटी आणखी पाच लस येण्याची शक्यता आहे.
 
यामध्ये स्पुतनिक व्ही, बायोलॉजिकल ई जॉनसन ॲण्ड जॉनसन व्हॅक्सीन, सीरम इंडियाज नोव्हावाक्स व्हॅक्सीन, जायडस कॅडिला व्हॅक्सीन आणि भारत बायोटेकची इंट्रानेसल लसीचा समावेश आहे.

रेकॉर्ड ब्रेक आकडे 

रविवारी देशात 1 लाख 70 हजारावर नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली त्यात 63 हजाराहून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. देशात एका दिवसात 904 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग गतीने पसरत आहे. तर सर्वाच तीव्र फटका महाराष्ट्राला बसला आहे. अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू, विकेंड लॉकडाऊन सारख्या उपायांच्या अंमलबजावणी होत आहे. तरीसुद्धा कोरोनाचे आकडे दररोज रेकॉर्ड ब्रेक करत आहेत.  

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पंजाब, केरळ, तेलंगाना, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग दुप्पट- तिप्पट वेगाने पसरतोय.

रुग्ण बरे होण्याचा दर घसरला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात काही दिवसांपासून  वाढत्या कोरोना संसर्गामुळे रुग्ण बरे होण्याच्या दर घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून एक  लाखापेक्षा अधिक रुग्ण दररोज देशात सापडत आहेत. देशातील एकूण ऍक्टिव केसेसमध्ये 70.82 टक्के केसेस महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक,  उत्तर प्रदेश आणि केरळचा आहे. यात एकट्या महाराष्ट्राचा वाटा 48.57 टक्के इतका आहे.