मुंबई : Covid-19 Updates:देशात कोरोना संक्रमणाचा धोका पुन्हा वाढत आहे. दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. (Coronavirus 2nd Wave in India)परंतु, गेल्या 24 तासांत कोविड -19 च्या नवीन घटनांमध्ये वाढ झाली आहे. देशभरात 24 तासात 48786 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये (Coronavirus New Cases) वाढ दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24तासांत देशभरात 48786 लोक कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. तर 991 लोकांचा बळी गेला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 जून रोजी कोरोना संसर्गाचा आकडा 40000च्या खाली गेला आणि 37566 लोकांना संसर्ग झाला होता. तर काल म्हणजे 30 जून रोजी 45951 पर्यंत वाढले आहेत.
India reports 48,786 new #COVID19 cases, 61,588 recoveries, and 1,005 deaths in the last 24 hours, as per the Union Health Ministry.
Total cases: 3,04,11,634
Total recoveries: 2,94,88,918
Active cases: 5,23,257
Death toll: 3,99,459Total Vaccination : 33,57,16,019 pic.twitter.com/o1FX1g1Xue
— ANI (@ANI) July 1, 2021
कोविड-19 च्या वाढत्या नवीन घटनांमुळे पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे आणि पुढील चार-पाच दिवसांत नवीन रुग्णांत वाढत राहिल्यास पुन्हा एक मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तज्ज्ञांनी कोरोनाव्हायरसच्या तिसर्या लाटेसंदर्भात (Coronavirus 3rd Wave)आधीच चेतावणी दिली आहे. लोकांना मास्क घालण्याशिवाय सामाजिक अंतराचे अनुसरण करण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत 3 कोटी 4 लाख 11 हजार 634 लोकांना देशभरात कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाली असून त्यापैकी 399459 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 2 कोटी 94 लाख 88 हजार 918 लोकांना आलेले आहे. बरे झाले आहेत. कोविड -19 मधील 5 लाख 23 हजार 257 लोकांवर देशभर उपचार सुरु आहेत.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत कोरोना लसीचे 33 कोटी 57 लाख 16 हजार 19 डोस देशभरात देण्यात आले आहेत. आतापर्यंत 27 कोटी 60 लाख 99 हजार 880 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर 5 कोटी 96 लाख 16 हजार 139 लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.