मुंबई : भारतात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases) आटोक्यात आलेली असली तर देखील आता चिंता वाढू लागल्या आहेत. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे काही शहरात पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) सारखी परिस्थिती आहे. चीनसह यूरोप आणि इतक काही देशांमध्ये ही कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. (Corona Death Toll rise in india)
भारतात आज कोरोना रुग्णांच्या मृतांच्या आकड्यांनी चिंता वाढवली आहे. भारतात एका दिवसात covid-19 चे 2,528 नवीन रुग्ण वाढले आहेत. देशातील कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4,30,04,005 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 29,181 झाली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात संसर्गामुळे आणखी 149 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,16,281 झाली आहे. आदल्या दिवशी कोरोनामुळे मृतांची संख्या 60 होती आणि त्यापूर्वी 98 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला होता.
29,181 रुग्णांवर उपचार
देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 29,181 वर पोहोचली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.07 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1,618 ने घट झाली आहे. मंत्रालयाने सांगितले की, साप्ताहिक आणि दैनंदिन संसर्गाच्या दरांमध्येही सातत्याने घट झाली आहे. साप्ताहिक संसर्ग दर 0.40 टक्के नोंदविला गेला आणि दैनंदिन दर देखील समान आहे.
कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के
अद्ययावत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 4,24,58,543 लोक संसर्गमुक्त झाले आहेत आणि कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.20 टक्के आहे. त्याच वेळी, देशव्यापी लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 180.97 कोटी पेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.
आतापर्यंत 5,16,281 लोकांचा मृत्यू झाला आहे
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 149 रुग्णांपैकी 130 रुग्ण केरळमधील होते. देशात आतापर्यंत 5,16,281 लोकांचा या साथीमुळे मृत्यू झाला असून त्यापैकी 1,43,762 रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. मृत्यूच्या एकूण प्रकरणांपैकी 67,138 रुग्ण हे केरळमधील आहेत. याशिवाय कर्नाटकातील 40,028, तामिळनाडूमधील 38,025, दिल्लीतील 26,145, उत्तर प्रदेशातील 23,492 आणि पश्चिम बंगालमधील 21,192 रुग्ण आहेत.